Assembly Election Result :...चुकांमधून शिकण्याची ताकद नाही'

देशात आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा (Assembly Election) निकाल लागणार आहे. या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.
Assembly Election Result
Assembly Election ResultDainik Gomantak

देशात आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये भाजप सत्ता राखण्यामध्ये यशस्वी होणार का? हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. आजच्या मतमोजीणीचे लाईव्ह अपडेट्स फक्त 'दै. गोमंतक'वर...

UP Election Result 2022: स्मृती इराणींचा राहुल-प्रियांका गांधींवर हल्लाबोल

पाच राज्यांच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर निशाणा साधला. "मला वाटत नाही की, त्यांच्याकडे चुकांमधून शिकण्याची ताकद आहे."

Goa Election Result 2022: गोव्यातील जनतेनं खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा भाजपला निवडून आणले आहे. विकास आणि सुशानाला गोवेकरांनी आशिर्वाद दिला आहे. 2017 नंतर पुन्हा एकदा 2022 मध्ये सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही यावेळी २० जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्ता स्थापन करण्यात अपक्ष आणि महाराष्ट्र वादी गोमन्तक पक्षाने आम्हाला साथ देणार असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आमचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे.

प्रमोद सावंत म्हणाले, ''आम्ही 22+ जागांचा विचार केला होता. मात्र आम्हाला काही जागांवर म्हणावं तसं यश मिळू शकलं नाही. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही सत्ता स्थापन करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. गोव्यातील जनतेपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने विकास घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.''

Goa Election Result 2022: फडणवीस म्हणाले, 'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याचा खऱ्या अर्थाने चेहरा मोहरा बदलला आहे. आम्हाला सत्ता स्थापन करण्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष आणि तीन अपक्षांनी आम्हाला समर्थन देऊ केले आहे. आम्हाला बहुमत मिळालं असल्यामुळे धावपळ करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका आधुनिक गोव्याची निर्मिती होईल. हा विजय गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आहे. त्याचबरोबर येणारी वर्षे खऱ्या अर्थाने गोव्याच्या समृध्दीची असणार आहेत. तसेच आम्हाला कॉंग्रेसचा आमदार घेण्याची गरज नाही.'

UP Election Result 2022: 'उत्तरप्रदेशातील जनतेने विकासाला मत दिलं'

उत्तरप्रदेशातील जनतेनं विकासाला मत दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने राज्यात अभूतपूर्व यश संरपादन केले. विकास आणि सुशासनाला उत्तरप्रदेशातील जनतेनं आशिर्वाद दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली चार राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे. विरोधकांनी मागील 2 ते 3 दिवसांत आमच्या विरोधात खोटा प्रचार केला, असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

शिवाय योगी पुढे म्हणाले, ''कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकारने प्रदेशातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या. गरीबांसाठी केलेल्या कामामुळेच भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. जातीवाद, परिवादाला राज्यातील जनतेनं तिलांजली दिली आहे. जनतेनंच विरोधकांची बोलती बंद केली आहे.''

UP Election Result 2022: योगी आदित्यनाथ लखनऊमध्ये भाजप मुख्यालयात पोहोचले

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील 5 कालिदास मार्गावरील निवासस्थान सोडून भाजप मुख्यालयात पोहोचले.

Punjab Election Result 2022: मनीष सिसोदिया म्हणाले, पंजाबमधील नागरिकांच्या मुद्यांना प्राधान्य दिले जाणार

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, 'पंजाबमधील लोकांच्या गरजांवर काम केले जाईल. केजरीवालांनी दिलेल्या हमीनुसार येत्या काळात विकास होईल. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गोव्यात पहिल्यांदाच 'आप' ला खाते खोलता आले आहे.'

UP Election Result 2022: भाजपने 30 जागा जिंकल्या, 220 जागांवर आघाडी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. मतमोजणीनंतर आत्तापर्यंत भाजपने 30 जागा जिंकल्या असून 220 जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष 3 जागा जिंकून 113 जागांवर आघाडीवर आहे, अपना दल 1 जागा जिंकून 11 जागांवर आघाडीवर आहे. आरएलडी 8 जागांनी आघाडीवर आहे, तर काँग्रेसने 1 जागा जिंकली असून 1 ने आघाडीवर आहे.

Goa Election Result 2022: भाजपने 20 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 9 जागा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्रेंडनुसार भाजपने 20 जागा जिंकल्या, काँग्रेसने 9 जागा जिंकल्या आणि 2 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक आणि आपने प्रत्येकी 2 जागा जिंकल्या तर गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवा पार्टीने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. अपक्षांनी 3 जागा जिंकल्या आहेत.

UP Election Result 2022: स्वामी प्रसाद मौर्य यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले

भाजप सोडून समाजवादी पक्षात दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य फाजीलनगर मतदारसंघातून निवडणूक पराभूत झाले आहेत. फाझिलनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेंद्र कुशवाह यांनी त्यांचा पराभव केला. पराभवानंतर स्वामी प्रसाद यांनी ट्विट करत म्हटले, 'सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. मी जनादेशाचा आदर करतो. मी निवडणूक हरलो मात्र संघर्षाची मोहीम सुरुच राहणार आहे.'

UP Election Result 2022: राजा भैया कुंडा विधानसभा मतदारसंघातून विजयी

बाहुबली नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया कुंडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी सपाचे गुलशन यादव यांचा पराभव केल्याचे वृत्त समोर येत आहे. कुंडा मतदारसंघातून राजा भैय्या सतत्याने विजयी होत आले आहेत. विशेष म्हणजे हा त्यांचा बालेकिल्ला आहे.

Goa Election Result 2022: पी. चिदंबरम म्हणाले- काँग्रेसने गोव्यातील जनतेचा जनादेश स्वीकारला

काँग्रेसने गोव्यातील जनतेचा जनादेश स्वीकारला असल्याचे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. आमचे 11 उमेदवार आणि मित्र पक्षाचा एक सदस्य विजयी झाला आहे. गोव्यातील जनतेने भाजपला जिंकून दिले असल्याचे देखील चिदंबरम यांनी यावेळी म्हटले आहे.

Punjab Election Result 2022: मुख्यमंत्री चरणजित सिंह यांनी भगवंत मान यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आम आदमी पक्षाच्या पंजाबमधील विजयाबद्दल अभिनंदन करताना म्हटले की, 'मी पंजाबच्या जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. विशेष म्हणजे आम आदमी पार्टी आणि त्यांचे निवडून आलेले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांचे विजयासाठी अभिनंदन करतो. मला आशा आहे की, ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील.'

Uttarakhand Election Results 2022: भाजपला 48 जागा, तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत आलेले निकाल आणि ट्रेंडनुसार, उत्तराखंडमधील विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपला 47 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या खात्यात 19 जागा जात आहेत. उत्तराखंडमध्ये दुसरे UKD खाते देखील उघडू शकला नाही.

UP Election Result 2022: अपर्णा यादव म्हणाल्या- 'माझा विश्वास जिंकला'

भाजप नेत्या अपर्णा यादव म्हणाल्या, "जे तुष्टीकरणाचे राजकारण करत होते, त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. माझ्या विश्वास जिंकला आहे." 'मला वाटते की, योगी सरकारपेक्षा चांगले सरकार असूच शकत नाही. आज मी एकच नारा देईन हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, सगळे भाजपचे.'

UP Election Result 2022: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विजयी

उत्तर प्रदेशातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहरमधून 1 लाख 20 हजार मतांनी निवडून आले आहेत.

Punjab Election Result 2022: हरपाल सिंग चीमा दिरबा विधानसभा मतदारसंघातून विजयी

पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते हरपाल सिंग चीमा यांना संगरुर जिल्ह्यातील दिरबा विधानसभा मतदारसंघातून विजयी घोषित करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याने शिरोमणी अकाली दलाचे गुलजार सिंग यांचा 50,655 मतांनी पराभव केला. पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार ओपी सोनी यांचा अमृतसर सेंट्रलमधून आम आदमी पक्षाचे उमेदवार अजय गुप्ता यांनी पराभव केला आहे.

Assembly Election Results 2022: काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले- आम्ही पराभवाच्या कारणांचा शोध घेऊ

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, उत्तर प्रदेशात काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यात आम्ही यशस्वी झालो, मात्र आम्ही त्या जनमताचे जागांमध्ये रुपांतर करु शकलो नाही. आम्ही उत्तराखंड आणि गोव्यात चांगली कामगिरी केली. परंतु बहुमताचा आकडा गाठू शकलो नाही. आम्ही पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करु.

Goa Election Result 2022: उत्पल पर्रीकर यांचा पणजी मतदारसंघातून पराभव

गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. गोव्यातील 40 विधानसभा जागांमध्ये भाजपला आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार 20 जागा मिळत आहेत. दरम्यान, पणजी आणि ताळगाव या जागांवर भाजपचे उमेदवार अतानासिओ मोन्झारेट आणि त्यांच्या पत्नी जेनिफर यांनी विजय मिळवल्याची बातमी समोर आली आहे. उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना येथून पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Assembly Election Results 2022: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेचा निर्णय स्वीकारला

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारला आहे. जनादेश जिंकणाऱ्यांचे अभिनंदन. मी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि जनतेच्या हितासाठी काम करत राहू.'

Manipur Election Results 2022: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह 17,000 हून अधिक मतांनी विजयी

मणिपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल आता वेगाने समोर येत आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री नॉन्गथोम्बम बिरेन सिंग यांनी हिंगंग विधानसभा जिंकून मोठा विजय मिळवला आहे. सीएम एन बिरेन सिंग यांनी हिंगांग मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिस्पर्धी पी सरचंद्र सिंग यांचा 17,000 मतांच्या फरकाने पराभव केला.

UP Election Result 2022: यूपीमध्ये भाजप 267 जागांवर पुढे आहे.

Goa Election Result 2022: प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यावर विश्वजित राणे म्हणाले...

गोव्यातील भाजप नेते विश्वजित राणे यांना प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदी कायम राहणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला माहीत नाही, हा संवेदनशील प्रश्न आहे.

Goa Election Result 2022: वाळपाई विधानसभा मतदारसंघातून भाजपचा विजय

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे गोव्यातील वाळपई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी रेवोलुशनरी गोवन पार्टीचे तुकाराम भरत परब यांचा 8085 मतांनी पराभव केला.

Uttarakhand Election Result 2022: खातिमा मतदारसंघातून पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाला

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खतिमा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मात्र, भाजप बहुमताच्या आकड्यांवर अजूनही आघाडीवर आहे. परंतु मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

UP Election Result 2022: शरद पवार म्हणाले- 'अखिलेश यांनी पूर्वीपेक्षा चांगली लढत दिली'

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ''यात सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा दोष नाही, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्यांनी निवडणुकीच्या निकालाचा विचार करु नये. पूर्वीपेक्षा त्यांनी अधिक चांगली लढत दिली आहे.''

UP Election Result 2022: यूपीमध्ये भाजप 265 जागांवर आघाडीवर, सपा 133 जागांवर आघाडीवर

उत्तर प्रदेशात मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत आलेले सर्व निकाल आणि दिसणारे ट्रेंड पाहता भाजपला 265 तर समाजवादी पक्षाला 133 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत बसपा 1, कॉंग्रेस 2 आणि इतरांच्या खात्यात 2 जागा जात असल्याचे दिसत आहे.

Goa Election Result 2022: देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

भाजप नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''गोव्यातील जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. आम्हाला 20 जागा मिळतील किंवा त्यापेक्षा 1-2 जागा जास्त जागा मिळतील. जनतेने पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. अपक्ष उमेदवार आमच्यासोबत येत आहेत. एमजीपीही आमच्यासोबत येत असून सर्वांना सोबत घेऊन आम्ही आमचे सरकार स्थापन करु.''

UP Election Result 2022: लखीमपूर खेरी जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजपने घेतली आघाडी

लखीमपूर जिल्ह्यातील 8 विधानसभा जागांवर भाजपने क्लीन स्वीप केल्याचे दिसत आहे. पालिया, मोहम्मदी, कास्ता, गोला, सदर, धौरहरा, निघासन, श्रीनगर आणि खेरी सदरमध्ये भाजपचे उमेदवार निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत.

Uttarakhand Election Result 2022: हरीश रावत म्हणाले - मी जनतेचा विश्वास संपादन करु शकलो नाही

लालकुआनमधील काँग्रेसचे उमेदवार हरीश रावत यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. एका फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “मी लालकुआन विधानसभा मतदारसंघातून माझ्या निवडणूक पराभवाची औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. लालकुवान परिसरातील जनतेचा विश्वास संपादन न केल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. मी त्यांना दिलेली निवडणूक आश्वासने पूर्ण करण्याची संधी गमावली आहे.

Punjab Assembly Election Results 2022: मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दोन्ही जागा गमावल्या

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना विधानसभा निवडणुकीत पंजाबच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. चरणजितसिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला आहे. या निवडणुकीत चन्नी यांनी चमकौर साहिब आणि भदौर या जागांवर निवडणूक लढवली होती, तरीही त्यांना आपली खुर्ची वाचवता आली नाही.

Manipur Election Results 2022: एन बिरेन सिंग म्हणाले- मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर राष्ट्रीय नेते निर्णय घेतील

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले की, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्हाला वेळ लागेल, निकाल येऊ द्या. आमचे राष्ट्रीय नेते मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर निर्णय घेतील, आम्ही पंतप्रधान मोदींच्या सर्वसमावेशक विकासाच्या मंत्रावर लक्ष केंद्रित करु.

Uttarakhand Election Result 2022: पुष्कर सिंह धामी खतिमा जागेवरुन सातत्याने मागे

उत्तराखंडच्या खतिमा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी अजूनही पिछाडीवर आहेत. पुष्कर सिंह धामी यांना आतापर्यंत 24,038 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या भुवनचंद्र कापरी यांना 29,218 जागा मिळाल्या आहेत. आतापर्यंतचा ट्रेंड बघितला तर, उत्तराखंडमधील 70 जागांपैकी 43 जागा भाजपच्या, तर 23 जागा काँग्रेसच्या खात्यात जात आहेत.

UP Election Result 2022: यूपीच्या कुशीनगर जिल्ह्यातील तमकुही राज जागा भाजपच्या खात्यात जाणार असल्याचं दिसत आहे. येथून भाजपचे असीम कुमार आघाडीवर आहेत. 17 फेऱ्यांनंतर त्यांना 62263 मते मिळाली आहेत. ते सपाचे उदय नारायण यांच्यापेक्षा 36 हजार मतांनी पुढे आहेत. उदय नारायण यांना 26938 मते मिळाली आहेत. यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू हेही या जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. ते सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना आतापर्यंत 20556 मते मिळाली आहेत.

Goa Election Result 2022: गोव्यात भाजपला अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा

गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित झाल्याचे दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राज्यातील अपक्ष उमेदवार - मॅन्युएल वाझ आणि अलेक्सिओ यांनी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Uttarakhand Election Result 2022: भाजप 42 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर

उत्तराखंडमध्ये निवडणुकीचे निकाल लागले आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हरीश रावत यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर त्यांची कन्या अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीणमधून विजयी झाल्या आहेत. आतापर्यंतचा ट्रेंड पाहता, उत्तराखंडमधील 70 जागांपैकी 42 जागा भाजपच्या, तर 24 जागा काँग्रेसच्या खात्यात जात आहेत.

Goa Election Results 2022: काँग्रेस नेते मायकल लोबो म्हणाले... आम्ही जनादेश स्वीकारतो'

काँग्रेस नेते मायकल लोबो म्हणाले की, ''आम्ही जनादेश स्वीकारला आहे. आम्हाला 12 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षमपणे काम करु. आता जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसला अधिक मेहनत करावी लागणार आहे.''

Punjab Assembly Election Results 2022: भगवंत मान म्हणाले- 'आधी बेरोजगारी हटवू'

आप चे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी संगरुरमधील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे स्वागत करताना म्हटले की, "आम्ही लोकसेवक आहोत. जनतेची सेवा करायची आहे, आम्ही आधी बेरोजगारी हटवू.

Punjab Assembly Election Results 2022: आप नेते भगवंत मान यांच्या घरी जल्लोष

AAP चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी त्यांच्या संगरुरमधील निवासस्थानी पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांचे स्वागत केले.

Punjab Assembly Election Results 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मतदारांचा निर्णय स्वीकारला

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करुन मी जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारतो असे म्हटले आहे. लोकशाहीचा विजय झाला.

UP Election Result 2022: निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, भाजप 259 जागांवर पुढे आहे.

Punjab Assembly Election Results 2022: पंजाबच्या धुरीणातून आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांचा विजय झाला.

UP Election Result 2022: यूपीच्या करहल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव विजयी झाले आहेत.

UP Election Result 2022: मतमोजणी दरम्यान, सपाने कार्यकर्त्यांना दिला संदेश

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सुरु असताना समाजवादी पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना ट्विट करुन सतर्क राहण्यास सांगितले आहे. SP ने ट्विट करत म्हटले की, "उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये 100 जागांचा फरक 500 मतांच्या जवळपास आहे. समाजवादी पक्ष आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Goa Election Results 2022: गोव्यात आप चा दुसरा विजय, क्रुझ सिल्वा विजयी

गोवा विधानसभेची दुसरी जागाही आम आदमी पक्षाने काबीज केली आहे. आम आदमी पक्षाचे क्रुझ सिल्वा हे वेळ्ळी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. क्रुझ सिल्वा हे इंजिनिअर आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते.

Manipur Election Result 2022: तिपइमुखमधून जेडीयूचे नांगुसांगलुर विजयी झाले

मणिपूरमधील तिपइमुख मतदारसंघातून जनता दल युनायटेडचे ​नंगुसनलुर सनाते विजयी झाले आहेत.

Punjab Assembly Election Results 2022: नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षाचे विजयाबद्दल अभिनंदन केले

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

Goa Election Results 2022: भाजप एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेण्याची चर्चा सुरु

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी आतापर्यंतचा कल पाहता गोव्यात भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'आम्ही एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेणार आहोत.'

UP Election Result 2022: लखीमपूरच्या जागेवरही भाजप आघाडीवर

यूपीच्या लखीमपूर जागेवर भाजपचे योगेश वर्मा सहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. इथे पाच फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. सपाचे उत्कर्ष वर्मा मधुर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

UP Election Result 2022: लखनऊमध्ये भाजपच्या जल्लोषाची तयारी

लखनऊ भाजप कार्यालयात एक मंच करण्यात येत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लखनऊमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही भाजप कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

UP Election Result 2022: काय आहे हाथरस सीट ची स्थिती

यूपीतील हाथरस आणि लखीमपूर या दोन्ही जागांवर बीजनी आघाडीवर आहे. या दोन्ही जागा खूप चर्चेत होत्या. हाथरस आणि लखीमपूरमध्ये योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हाथरसमध्ये भाजपच्या अंजुला सिंह माहूर 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत. इथे सहा फेऱ्यांचे मतदान झाले आहे.

Goa Election Results 2022: काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस

गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांचा कल पाहिला तर भाजपला 19 तर काँग्रेसला 12 जागा मिळत आहेत. गोव्यात टीएमसी 3 जिंकताना दिसत आहे तर AAP 2 तर इतरांना 4 जागा मिळताना दिसत आहेत.

Punjab Assembly Election Results 2022: सुखबीर सिंग बादल जलालाबादमधून पराभूत

शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांना पंजाबमधील जलालाबाद विधानसभा मतदारसंघातून मोठा धक्का बसला आहे. सुखबीर सिंग बादल जलालाबादमधून पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या जगदीप कंबोज यांनी चुरशीची लढत देत त्यांचा पराभव केला आहे.

UP Election Result 2022: यूपीमध्ये भाजपला 42% आणि सपाला 32% मते मिळाली

यूपीमधील 403 जागांचा कल बघितला तर भाजपच्या खात्यात 269+ जागा जात आहेत, तर सपाच्या खात्यात 120+ जागा जात आहेत. यूपीमधील निकालांचा कल पाहता भाजपला 42 टक्के तर सपाला 32 टक्के तर बसपाला 13 टक्के मते मिळाली आहेत.

Punjab Election Result 2022: पटियालमधून कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत, आपचे अजित पाल सिंग विजयी

पतियाळा विधानसभा मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अमरिंदर सिंग यांचा आम आदमी पक्षाच्या अजित पाल सिंग यांनी 19 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

Goa Election Result 2022: साखळी मतदार संघातून भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा 500 मतांनी विजय झाला आहे.

Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. त्यांनी पंजाबमधील सीएम उमेदवार भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Punjab Election Result 2022: पंजाबमधील मतदारांनी झाडू नव्हे तर व्हॅक्यूम क्लिनरचा वापर केला: राघव चढ्ढा

आप नेते राघव चढ्ढा म्हणाले, पंजाबमधील मतदारांनी आम आदमीच्या विकासाला मतदान केले.

UP Election Result 2022: पूर्व शिक्षण मंत्री अनुपमा जयस्वाल बहराइचमधून पिछाडीवर

पूर्व शिक्षण मंत्री अनुपमा जयस्वाल बहराइचमध्ये पिछाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार यासर शाह 5322 मतांनी आघाडीवर आहेत. इथे पाच फेऱ्यांची मतमोजणी पार पडली आहे. यासर शाह हे यापूर्वी सपा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत.

Uttarakhand Election Result 2022: उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे खाते उघडले, लोहाघाट जागेवर विजय

उत्तराखंडमधून काँग्रेससाठी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमधील लोहघाट मतदारसंघातून काँग्रेसने विजय मिळवला आहे. लोहाघाटमधून खुशालसिंग अधिकारी भाजपच्या पूरणसिंग फरत्याल यांना मागे टाकत विजयी झाले आहेत.

Manipur Election Result 2022: काँग्रेस पराभवाच्या मार्गावर

मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या जवळ पोहोचली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी काँग्रेस फक्त 8 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 27 जागांवर पुढे असून त्यांना 6 जागांचा फायदा होताना दिसत आहे.

Goa Election Result 2022: गोव्यात भाजपची सत्ता कायम

Punjab Election Result 2022: पंजाब भाजपचे अध्यक्ष अश्विनी शर्मा विजयी

पठाणकोट मतदारसंघातून पंजाब भाजप अध्यक्ष अश्विनी शर्मा यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अमित विज आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवार विभूती शर्मा यांचा पराभव केला.

Goa Election Result 2022: पणजीमधून बाबूश मोन्सेरात यांनी गोव्याचे दिवंगत पूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा पराभव केला आहे.

UP Election Result 2022: निवडणूक आयोगाच्या मतानुसार, यूपीमध्ये भाजप मोठ्या आघाडीच्या मार्गावर आहे. तसेच भाजप उत्तर प्रदेशमध्ये 241 जागांवर आघाडीवर आहे.

UP Election Result 2022: राजा भैया पुन्हा आघाडीवर

प्रतापगडच्या कुंडा मतदारसंघातून सुरुवातीला मागे पडलेले राजा भैय्या पुन्हा आघाडीवर आले आहेत.

Punjab Election Result 2022: माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल 5000 मतांनी पिछाडीवर

पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल लांबी मतदारसंघातून सातत्याने पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या 4 फेऱ्यांनंतर प्रकाश सिंह आम आदमी पार्टीच्या गुरमीत सिंह यांच्यापेक्षा 5 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

Goa Election Result 2022: गोव्याचे दिवंगत पूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर पिछाडीवर

गोव्यातील पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवार आणि राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल मनोहर पर्रीकर पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये अपक्ष उमेदवार उत्पल मनोहर पर्रीकर 4783 मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार 5496 मतांनी आघाडीवर आहेत.

गोव्यात कॉंग्रेस नेते दिंगबर कामत मडगाव मतदारसंघातून आघाडीवर

UP Election Result 2022: ट्रेंडमध्ये भाजपचे शतक

बीजेपी+272, सपा+116, बीएसपी+5, कांग्रेस+4, अन्य+3

Punjab Election Result 2022: काँग्रेस 8 जागांवर पुढे

कांग्रेस+13, AAP+89 अकाली दल+7 बीजेपी+5 अन्य+3

Uttarakhand Election Result 2022: भाजप 22 जागांवर पुढे

बीजेपी+45, कांग्रेस+21, AAP+0, अन्य+4

Goa Election Result 2022: काँग्रेस 8 जागांवर पुढे

बीजेपी+18, कांग्रेस+9, NPF+0, NPEP+0, अन्य+25

Manipur Election Result 2022: काँग्रेस 8 जागांवर पुढे

बीजेपी+26, कांग्रेस+9, NPF+0, NPEP+0, अन्य+25

Uttarakhand Election Result 2022: सहसपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आयेंद्र शर्मा 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

बीजेपी+45, कांग्रेस+21, AAP+0, अन्य+4

UP Election Result 2022: गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार 232 मतदारसंघात आघाडी घेतली आहे.

Uttarakhand Election Result 2022:

हरीश रावत 6885 मतांनी पिछाडीवर

उत्तराखंडचे शिक्षण मंत्री अरविंद पांडे गदरपूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या फेरीत पुढे आहेत. मात्र लाल कुआँ विधानसभा मतदारसंघातून हरीश रावत 6885 मतांनी पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत भाजपचे मोहन सिंग बिश्त यांना 14524 आणि हरीश रावत यांना 7639 मते मिळाली.

Goa Election Result 2022: ट्रेंडमध्ये भाजप 18 आणि काँग्रेस 12 जागांवर पुढे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आघाडीवर

गोव्यातील 40 जागांपैकी भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळी मतदारसंघातून जवळपास 300 मतांनी आघाडीवर आहेत.

UP Election Result 2022: लखनऊमध्ये भाजप 9 पैकी 6 जागांवर पुढे

लखनऊमध्ये भाजप 9 पैकी 6 जागांवर पुढे आहे, तर सपा इतर 3 जागांवर पुढे आहे. लखनऊ कॅंटमधून भाजपचे उमेदवार ब्रजेश पाठक, लखनऊ सेंट्रलमधून भाजपचे उमेदवार रजनीश गुप्ता, लखनऊ पश्चिममधून भाजपचे उमेदवार अंजनी श्रीवास्तव, बीकेटीमधून भाजपचे उमेदवार योगेश शुक्ला, लखनऊ पूर्वचे भाजपचे उमेदवार आशुतोष टंडन, मलिहाबादचे भाजपचे उमेदवार जय देवी, सपाचे मोहनलाल मोहनलाल. गंजच्या उमेदवार सुशीला सरोज, लखनऊ उत्तरमधून सपा उमेदवार पूजा शुक्ला, सरोजिनी नगरमधून सपा उमेदवार अभिषेक मिश्रा आघाडीवर आहेत.

Manipur Election Result 2022:

भाजप 27 जागांवर आघाडीवर

मणिपूरमध्ये 60 सदस्यीय विधानसभेत भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे. इतर 24 जागांवर आघाडीवर.

UP Election Result 2022:

बीजेपी+263, सपा+110, बसपा+4, कांग्रेस+4, अन्य+3

UP Election Result 2022:

  • स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर

यूपीच्या फाजिलनगर विधानसभा मतदारसंघातून सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने पिछाडीवर आहेत.

Uttarakhand Election Result 2022:

काँग्रेसला मागे टाकत पिथौरागढमध्ये पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली

  • 42-धारचुला विधानसभा

  • भाजप - 1713

  • काँग्रेस - 3244

  • 43-दिदिहाट विधानसभा

  • भाजप -1955

  • काँग्रेस-1283

  • स्वतंत्र-1776

  • 44-पिथौरागढ विधानसभा

  • भाजप-2661

  • काँग्रेस - 2956

  • 45- गंगोलीहाट विधानसभा

  • भाजप - 2961

  • काँग्रेस-1873

तीन राज्यांचे मुख्यमंत्री मागे

पंजाबमधील आपच्या कार्यालयात सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. प्रसिध्द अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगा विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल जलालाबाद विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. पंजाबमध्ये चन्नी, उत्तराखंडमध्ये धामी, आणि गोव्यात प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत. अयोध्या विधानसभेतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वेदप्रकाश गुप्ता 2100 मतांनी आघाडीवर आहेत.

UP Election Result 2022: भदोहीमध्ये सपा पुढे

भदोही विधानसभा मतदारसंघातून सपाचे राम किशोर आघाडीवर आहेत. गाझियाबादमधून भाजपचे अतुल गर्ग आघाडीवर

Uttarakhand Election Result 2022: खतिमामधून सीएम पुष्कर सिंह धामी आणि लालकुवामधून काँग्रेसचे हरीश रावत मागे आहेत.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खतिमा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. त्याचवेळी लालकुव्यातून काँग्रेसचे हरीश रावतही पिछाडीवर आहेत.

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत 436 मतांनी पिछाडीवर

Punjab Election Result 2022: सिद्धू-मजिठिया लढाईत AAP ला फायदा

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजीठिया यांच्या लढाईत आम आदमी पक्षाचे उमेदवार जीवन ज्योत कौर यांनी आघाडी घेतली आहे.

Punjab Election Result 2022: चरणजीत सिंह चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, अमरिंदर सिंग आणि प्रकाशसिंग बादल पिछाडीवर

माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या पटियाला शहर विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या अजित पाल कोहली यांच्यापेक्षा 3300 मतांनी पिछाडीवर आहेत.

  • अकाली दलाचे मजिठिया आघाडीवर आहेत.

  • पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत.

  • नवज्योतसिंग सिद्धू तिसऱ्या क्रमांकावर.

  • अमरिंदर सिंग पिछाडीवर आहेत.

  • प्रकाशसिंग बादलही पिछाडीवर आहेत.

UP Election Result 2022:

उत्तर प्रदेशात कोण पुढे आणि कोण मागे?

  • देवरिया सदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शलभमणी त्रिपाठी आघाडीवर आहेत.

  • गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आघाडीवर आहेत.

  • भाजपकडून समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर आहेत.

  • उत्तर लखनऊमधून भाजपचे नीरज व्होरा आघाडीवर आहेत.

  • मथुरेतून भाजपचे श्रीकांत शर्मा आघाडीवर आहेत.

  • किथोरमधून सपा उमेदवार शाहिद मंजूर पुढे आहेत.

  • मेरठमधून भाजपचे उमेदवार कमल दत्त पुढे आहेत.

  • चंदपूर मतदारसंघातून सपाचे राय स्वामी ओमवेश आघाडीवर आहेत.

  • चंदपूर मतदारसंघातून सपाचे राय स्वामी ओमवेश आघाडीवर आहेत.

बीजेपी+200, सपा+105, बीएसपी+5, कांग्रेस+3, अन्य+3

Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये आम आदमी पार्टी पुढे

AAP+44, कांग्रेस+30, अकाली दल+9, बीजेपी+3, अन्य+0

Uttarakhand Election Result 2022: भाजप 34 जागांवर पुढे

बीजेपी+34, कांग्रेस+28, AAP+1, अन्य+1

UP Election Result 2022:

  • राजा भैया पिछाडीवर आहेत, तर अखिलेश यादव पुढे.

  • करहलमधून अखिलेश यादव आघाडीवर.

  • नोएडामधून भाजपचे उमेदवार पंकज सिंह आघाडीवर.

  • लखनऊ पूर्वमधून आशुतोष टंडन आघाडीवर.

  • आझम खान रामपूरमधून आघाडीवर.

  • जसवंत नगरमधून शिवपाल सिंह यादव आघाडीवर.

  • लखनऊ कॅन्टमधून ब्रजेश पाठक आघाडीवर आहेत.

  • बीजेपी+158, समाजवादी पार्टी+123, बीएसपी+6, कांग्रेस+3, अन्य+4

Manipur Election Result 2022: काँग्रेस 20 जागांवर पुढे

बीजेपी+20, कांग्रेस+14, NPF+2, NPEP+5, अन्य+0

Goa Election Result 2022: काँग्रेस 17 जागांवर पुढे

कांग्रेस+ 17, बीजेपी+14, AAP+0, टीएमसी+0, अन्य+02

UP Election Result 2022: भाजपने ट्रेंडमध्ये 100 चा आकडा पार केला

  • उत्तर प्रदेशचे मंत्री श्रीकांत शर्मा मथुरेतून आघाडीवर आहेत.

  • मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून अखिलेश यादव आघाडीवर आहेत.

  • रायबरेलीमधून भाजपच्या उमेदवार अदिती सिंह आघाडीवर आहेत.

  • उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक लखनऊ कॅंटमधून पुढे.

  • रामपूरमधून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आघाडीवर आहेत.

  • बीजेपी+132, सपा+77, बीएसपी+4 कांग्रेस+2, अन्य+2

पंजाबमध्ये सुखबीर बादल आणि यूपीमध्ये अखिलेश पुढे

मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून अखिलेश यादव आघाडीवर आहेत. तर पंजाबमधील जलालाबाद विधानसभा मतदारसंघातून अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल आघाडीवर आहेत.

Goa Election Result 2022: काँग्रेस 8 जागांवर पुढे

बीजेपी+16, कांग्रेस+15, AAP+0, टीएमसी+0, अन्य+02

Punjab Election Result 2022: AAP 35 जागांवर पुढे

कांग्रेस+20, AAP+35, अकाली दल+5, बीजेपी+2, अन्य+0

UP Election Result 2022: ट्रेंडमध्ये भाजप 100 पार

बीजेपी+102, सपा+67, बीएसपी+2, कांग्रेस+2, अन्य+2

Manipur Election Result 2022: काँग्रेस 8 जागांवर पुढे

बीजेपी+8, कांग्रेस+3, NPF+0, NPEP+0, अन्य+0

Uttarakhand Election Result 2022: भाजप 22 जागांवर पुढे

बीजेपी+22, कांग्रेस+19, AAP+0 अन्य+0

Punjab Election Result 2022: काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर

कांग्रेस+8, AAP+ 6, अकाली दल+ 2, बीजेपी+ 0, अन्य 0

  • उत्तरप्रदेशात भाजप 31 जागांवर आघाडीवर

मोहसीन रझा म्हणाले - यावेळी 300 पार

उत्तर प्रदेशचे मंत्री मोहसीन रझा म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारने राज्यात अभूतपूर्व केलेले काम आहे, त्यामुळे लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल की, आम्ही 300 हून अधिक जागा जिंकल्याला असू.

  • योगी मंदिरात पोहोचले

निवडणूक निकालापूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पहिल्यांदा पोस्टल बॅलेटच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. सकाळी ८ वाजता पोस्टल मतपेटी उघडली जाईल. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांची मोजणी केली जाईल. सायंकाळपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक मतदान केंद्रांवर कलम 144 लागू करण्यात आले आहे.

  • हरीश रावत म्हणाले - आम्हाला काळजी नाही

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत म्हणाले, "मी एकदा 48 जागा जिंकण्याबद्दल बोललो होतो, आता काही जागा त्याच्या आसपास येतील. आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही.

  • संगरुर गुरुद्वारामध्ये भगवंत मान यांनी दर्शन घेतले

    आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी संगरुर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना साहिब येथे नतमस्तक झाले. यावेळी ते म्हणाले, "आम्हाला आशा आहे की पंजाबच्या जनतेने परिवर्तनासाठी मतदान केले आहे."

  • योगींचे मंत्री मंदिरात पोहोचले

उत्तर प्रदेशचे मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांनी गुरुवारी सकाळी प्रयागराजमधील हनुमान मंदिराला भेट दिली. आज उत्तर प्रदेशातील 403 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकालही जाहीर होत आहेत.

  • 'आप' ने पंजाबमध्ये जल्लोषाची तयारी सुरु केली

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जल्लोषाची तयारी सुरु केली आहे. राज्यातील पक्षाचे मुख्यालय सुशोभित करण्याचे काम सुरु आहे.

  • गोवा मतमोजणीसाठी सुसज्ज झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com