Congress Irinio Coutinho and Bholanath Ghadi joins  Trinamool
Congress Irinio Coutinho and Bholanath Ghadi joins Trinamool Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काँग्रेसचे इरिनियो कुतिन्हो, भोलानाथ घाडी ‘तृणमूल’मध्ये दाखल

दैनिक गोमन्तक

मडगाव: एका राजकीय घडामोडीमध्ये कुंकळ्ळी येथील काँग्रेसचे माजी गट सचिव इरिनियो कुतिन्हो आणि साळगाव येथील काँग्रेसचे (Congress) माजी उत्तर गोवा जिल्हा सरचिटणीस भोलानाथ घाडी यांनी पणजी येथील पक्ष कार्यालयात आयोजित दोन वेगळ्या कार्यक्रमात गोवा तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला.

इरिनियो कुतिन्हो यांचे तृणमूलच्या गोवा प्रभारी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra), राज्यसभा खासदार आणि तृणमूल गोवा सह-प्रभारी सुश्मिता देव आणि मीडिया समन्वयक ओम प्रकाश मिश्रा यांनी पक्षात स्वागत केले.

इरिनियो कुतिन्हो म्हणाले, आज मला गोवा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याचा अभिमान वाटतो. मी पक्षात सामील झालो आहे, कारण स्थानिक तसेच राष्ट्रीय नेतृत्वाने केलेल्या कामामुळे मी प्रभावित झालो आहे. तसेच, ''माझे घर, मालकी हक्क'', गृहलक्ष्मी आणि युवा शक्ती यांसारख्या योजना ज्या ''टीएमसी'' राबवत आहेत, त्या केवळ प्रभावशाली नाहीत तर त्या खूप प्रभावीही असतील. त्यानंतर माजी उत्तर गोवा जिल्हा सरचिटणीस भोलानाथ घाडी आणि त्यांच्या समर्थकांसह राज्यसभा खासदार देव यांच्या उपस्थितीत गोवा ''टीएमसी'' मध्ये दाखल झाले. भोलानाथ घाडी म्हणाले, मी पूर्वी काँग्रेसशी संबंधित होतो, पण ते भाजपमध्ये विलीन झाले. त्यामुळे प्रत्यक्षात भाजपला पराभूत करण्यासाठी गंभीर असलेला एकमेव पक्ष ''टीएमसी'' आहे आणि म्हणून मी त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. गोमंतकियांचा विकास आणि कल्याण करणे, हा तृणमूल काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute ODP: कळंगुट ओडीपी खटला लांबणीवर; सुनावणीसाठी तयार नसल्याने सरकारवर ओढावली नामुष्की

Goa Rain Update: गोव्यात 'यलो अलर्ट': पणजीत सर्वाधिक तापमानाची नोंद

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

SCROLL FOR NEXT