Congress Meeting after goa elections
Congress Meeting after goa elections Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड 26 जागांसाठी आशावादी

दैनिक गोमन्तक

पणजी: स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी गोव्यातील लोकांनी विश्वास दाखवून जवळपास २६ जागा मिळवण्यास पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी आपल्या उमेदवारांसह शहरातील हॉटेलमध्ये मतदानाचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीएफपीचे अध्यक्ष विजय सरदेसाई आदी उपस्थित होते.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) माध्यमातून गोवावासीयांनी देशाला वेगळी दिशा दाखवली आहे. लोकांनी मतांच्या विभाजनाचे समर्थन केले नाही. त्यांनी भाजपला (BJP) हरवण्यासाठी मतदान केले. मी सर्व गोवावासियांचा आभारी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले. भाजपला दहापेक्षा कमी जागा मिळतील. त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पराभूत होतील, असा टोलाही चोडणकर यांनी लगावला.

सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदान (बॅलेट व्होट) करताना भाजपाच्या दबावाखाली येवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप सरकारची मुदत संपली आहे. काँग्रेस नवीन सरकार स्थापन करत आहे, असा दावाही त्यांनी केला.

लोकांच्या प्रतिसादावरुन असे दिसून येते की त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मतदान केले आहे. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी गोव्यातील जनतेला सलाम करतो, अशा शब्दात दिगंबर कामत यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, निकाल लागल्यानंतर भाजपचा अहंकार कमी होईल.

गोव्यातील लोकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळाल्याने आनंद होत असल्याचे वक्तव्य दिनेश गुंडू राव यांनी केलं. आम्ही लोकांचा आवाज ऐकला आणि नवी काँग्रेस (Congress) दिली, असंही ते पुढे म्हणाले. काँग्रेस नेत्यांनी खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, के सी वेणुगोपाल आणि इतर नेत्यांचे गोव्यात प्रचार केल्याबद्दल आभार मानले. भाजपच्या व्हायरसचा नायनाट केल्याबद्दल विजय सरदेसाई यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT