Goa Election  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा निवडणुकीत मतदान करण्यावरुन ज्येष्ठ नागरिकांच्या मनात संभ्रम

गोवा विधानसभा निवडणूक (Election) लढवणाऱ्या उमेदवारांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. रुग्णसंख्येत देखील घट होत आहे, असे आरोग्य सेवा संचालनालयाने (DHS) म्हणणे असले तरी आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 14 फेब्रुवारीला घराबाहेर पडण्यावरून ज्येष्ठ नागरिकांच्या मनात अजून ही संभ्रम आहे. (Goa Election Latest News)

गोवा विधानसभा निवडणूक (Election) लढवणाऱ्या उमेदवारांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कमी मतदान दर त्यांच्या विजयात बाधा आणू शकतो.

दरम्यान, निवडणूक आयोगाने घोषणा केली होती की ज्येष्ठ नागरिकांची (Senior Citizens) ओळख त्यांच्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसरद्वारे केली जाईल आणि ते घरबसल्या मतदान करू शकतील. मात्र या घोषणेनंतर ज्येष्ठ नागरिकांना पुढे कोणतीही माहिती मिळालेली नाही. परिणामी नागरिकांच्या मनात या घोषणेबाबत शंका उत्पन्न झाली आहे.

“आम्हाला आजपर्यंत याबाबत कोणताही फोन आलेला नाही. सरकार किंवा निवडणूक आयोगाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या घरी भेट दिली नाही. आम्हाला अर्ज करायचा आहे की नाही हे आम्हाला माहित नाही आणि आम्हाला त्यासंबंधी स्पष्ट तपशील मिळालेला नाही. आम्हाला या प्रक्रियेबाबत काही प्रश्न आहेत," असे नागरिक म्हणाले.

मागील काही दिवसात कोरोना (Coronavirus) संसर्ग वाढल्यामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला. दरम्यान, अनेक ज्येष्ठ नागरिक घरीच बसून होते. मतदानासाठी घरा बाहेर पडणे आणि गर्दीत मिसळणे त्यांना जोखमीचे वाटते. “मतदानच्या वेळेस खूप गर्दी असेल तर मी घराबाहेर कसा पडणार हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्या कुटुंबीयांना माझी काळजी आहे. घराबाहेर पडावे का नाही या संदर्भात मी माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेईन," असे एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT