भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी बाबू आणि राजन यांच्यात रस्सीखेच Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी बाबू आणि राजन यांच्यात रस्सीखेच

स्वाभिमानी पेडणेकरांच्या जीवावर निवडून येणार आणि आमदार झालो तरीही भाजपा सोबतच असणार

Nivrutti Shirodkar

मोरजी : 2022 च्या विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Assembly Election) पेडणे (Pernem) मतदार संघात भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी एका बाजूने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Manohar Ajgaonkar) आणि मिशन फॉर लोकलचे स्थानिक नेते राजन कोरगावकर यांच्यात रस्सी खेच जोरदार सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूने भाजपचे (BJP) जेष्ठ आणि कार्यकरत्येही यंदाची उमेदवारी राजन कोरगावकर यांना द्यावी असा भाजपच्या नेत्यावर दबाव आणत आहे.

भाजपाची उमेदवारी ही आपल्यालाच मिळेल असा डावा वारंवार उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर करतात तर भाजपचे जेष्ठ कार्यकरत्ये ही उमेदवारी राजन कोरगावकर यांना मिळवून देण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे ,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे समर्थक हळू हळू मिशन फॉर लोकलच्या गोटात सामावले जातात असे चित्र दिसत आहे.

याच पाश्वभूमीवर मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांना छेडले असता यंदाची भाजपाची उमेदवारी ही आपण स्थानिक आणि आपल्यासोबत स्वाभिमानी पेडणेकर भूमिपुत्र त्यात सर्व पक्षाचे कार्यकरत्ये यांचा पाठिंबा दिवसेंदिवस मिळत आहे, असा दावा करून जरी आपल्याला भाजपाची उमेदवारी मिळाली नाही तर आपण स्वाभिमानी पेडणेकरांच्या जीवावर निवडून आमदार होणार आणि आमदार झालो तरीही भाजपा सोबतच असणार अशी ग्वाही दिली.

80 टक्के भाजपा कार्यकरत्ये पूर्वीचे व आताचे आपल्यासोबत आहे ,आपण एक पेडणेकर, ईथल्या मातीत जन्म घेतला ,त्यामुळे आपल्याला ईथल्या समस्याची जाणीव आहे.आता पर्यंत बाहेरचे उमेदवार या राखीव मतदार संघातून आमदार झाले त्यांनी आजपर्यंत या भूमितला एक तरी आपल्या तोडीचा नेता तयार केला का ,असा सवाल उपस्थित केला.

बाबूंवर ही वेळ का आली?

बाबू आजगावकर या राखीव मतदार संघातुन चार वेळा निवडून आला ते प्रत्येक वेळी मंत्री झाले आता ते उपमुख्यमंत्री झाले। ,उपमुख्यमंत्री असल्याने 34000 हजाराची मतदार त्यांच्यासोबत असल्याला हवे होते, ते त्यांच्यासोबत का नाही ,सरपंच उपसरपंच पंच समर्थक एक एक मिळून त्यांची साथ का सोडतात ,भाजपचे अनेक कार्यकरत्ये समर्थक पदाधिकारी आजगावकर यांची साथ सोडून मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांच्यात सोबत राहून कोरगावकर यांचाच भाजपाची उमेदवारी द्यावे अशी मागणी करण्याची वेळ का आणावी , ते बाबू पासून दूर का जात आहेत, बाबू आजगावकरनी विकास केला तर मग त्यांची साथ सोडून कार्यकरत्ये का जातात,असा प्रश्न निर्माण होत आहे.

बाबू आजगावकर खरोखरच नोकर सेवक आहे का?

हल्ली उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आपण पेडणेकरांचा नोकर आणि सेवक आहे म्हणत आहेत त्यांच्यावर ही वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. खरं तर लोकांनी त्यांना म्हणायला हवे होते की बाबू आजगावकर आमचे सेवक आहेत.

पेडणे मतदार संघातून सध्या भाजपा मध्ये दोन गट उघडपणे पडल्याने एक गट उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासोबत आणि दुसरा गट मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांच्या बाजूने असल्याने आता उमेदवारी स्थानिक म्हणून भाजपने राजन कोरगावकर याना द्यावी यासाठी समर्थक पत्रकार परीषद घेवून मागणी करत आहेत. त्यामुळे हळू हळू भाजपातूनच बाबू आजगावकर याना स्वकीयाकडून विरोध वाढत आहे. एका बाजूने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी केले आहे. मात्र त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यासाठी मंत्री आजगावकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांच्याकडे बाबू वर नाराज असलेल्या समर्थकांनी जर यावेळी स्थानिक उमेदवार द्यावा म्हणून मागणी केली आणि ती मागणी पक्षापर्यंत गावस यांनी पोचवली तर त्यांचे काय चुकले. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याबर त्यांचे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्ये नाराज का बनले यांचा त्यांनी अभ्यास करून या सर्वाना एकत्रित बसवून त्यांच्या समस्य्या त्यांचे प्रश्न समजून घेवून तोडगा काढायला हवा होता. ज्या जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला त्या कार्यकर्त्याना 2017 नंतर कुणीच वाली राहिला नाही. त्या नाराज असलेल्या कार्यकर्त्याना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी एकत्रित का केले नाही. असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दुसऱ्या बाजूने मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना आपल्याला अनेक जेष्ठ आणि नवीन भाजपा कार्यकर्त्यांचा दिवसेंदिवस पाठींबा आपण स्थानिक म्हणून मिळत आहे. आपल्याला भाजपची उमेदवारी कार्यकर्त्ये मिळवून देतील असाविश्वास व्यक्त करून जरी उमेदवारी नाही मिळाली तरीही आपण निवडणुकी पेडणे मतदार संघाच्या अस्तित्वासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आपण निवडून आमदार म्हणून आलो तरीही भाजपासोबतच असणार असे कोरगावकर यांनी सांगितल्याने या मतदार संघातून राजकीय रंग वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT