गोवेकरांना वेध लागले नाताळ आणि नववर्षाचे..!

यंदा हे दोन्ही उत्सव उत्साहात साजरे होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Christmas Festival : गोवेकरांना वेध लागले नाताळ आणि नववर्षाचे..!
Christmas Festival : गोवेकरांना वेध लागले नाताळ आणि नववर्षाचे..!Dainik Gomantak

गोवा वेल्हा (Christmas Festival) : डिसेंबर महिना उजाडला आणि लोकांना नाताळ व नववर्ष 2022 चे वेध लागायला सुरवात झाली. तिसवाडी, बार्देश, सासष्‍टी, मुरगाव, काणकोण तालुका त्‍याला अपवाद नाही. ठिकठिकाणी या उत्सवाची लगबग दिसून येत आहे. यंदा हे दोन्ही उत्सव (Festival ) उत्साहात साजरे होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Christmas Festival : गोवेकरांना वेध लागले नाताळ आणि नववर्षाचे..!
गोव्यात मंगलमय वातावरणात धार्मिक उत्सवांना सुरवात..!

संपूर्ण गोवाभर नववर्ष व नाताळ (Christmas) उत्सव मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. त्‍यानिमित्त आठवडाभर त्यांच्या जन्माचे स्वागत व नाताळचे कार्यक्रम आखण्यात लोक गुंतले आहे. गावातली लहान-मोठी गिरिजाघरे तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घराघरांत हा उत्सव साजरा करतात. स्थानिक धर्मगुरुंच्‍या मार्गदर्शनाखाली नाताळ उत्सवाची कामे सुरू झाली आहेत. यामध्‍ये रंगरंगोटी, सजावट, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत आकर्षक गोठे, नक्षत्रे आकार घेत आहेत. चर्चमध्येही उत्‍सवाचे नियोजन करण्‍यासंदर्भात कामे सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com