पणजी: साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यात 'कांटे की टक्कर' होती. मात्र प्रमोद सावंत यांनी धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे. साखळी मतदारसंघात जनतेने कॉंग्रेसला नाकारत भाजपला कौल दिला आहे. सावंत 650 मतांनी विजयी झाले आहेत. धर्मेश सगलानी यांच्या परभवामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे भाजपच्या समर्थकांनी साखळीत जल्लोष केला आहे. (Pramod Sawant vs Dharmesh Saglani News)
काही दिवसांपूर्वी प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना गोव्यात भाजपचाच (BJP) विजय होणार, असा विश्वास दर्शवला होता.
एका मुलाखतीत सावंत म्हणाले होते, गोवा विधानसभा निवडणुकीत माझा पराभव व्हावा म्हणून सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, याचा काहीही फायदा होणार नाही. मी साखळीतून पाच हजार मताधिक्याने निवडून येणार. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस (Congress) नेत्यांनी साखळीत प्रचार करून देखील माझाच विजय झाला होता. त्यावेळी मी सात हजार मतांनी निवडून आलो होतो.यावेळी सुद्धा माझाच विजय होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांचे हे भाकीत खरे ठरले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.