पणजीत भाजपने गड राखला; उत्पल पर्रीकर पराभूत

गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच पणजीत भाजपचा उमेदवार कोण असणार या चर्चेला उधाण आले होते.
Utpal Parrikar News |Goa election result 2022 News
Utpal Parrikar News |Goa election result 2022 News Dainik Gomantak

पणजी: पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. उत्पल पर्रीकर यांचा 713 मतांनी पराभव झाला आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला. पणजीत भाजप समर्थक जल्लोष करत आहेत, तर उत्पल पर्रीकर यांच्या गोटात शांतता आहे. (Utpal Parrikar news updates)

Utpal Parrikar News |Goa election result 2022 News
Goa Election 2022 Live Update: दिगंबर कामत विजयाच्या उंबरठ्यावर

गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच पणजीत भाजपचा उमेदवार कोण असणार या चर्चेला उधाण आले होते. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) आणि बाबूश मोन्सेरात यामध्ये भाजपने मोन्सेरात यांना पसंती दिली. नाराज उत्पल पर्रीकर यांनी भाजप विरोधात बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पर्रीकर यांनी पणजीत जोरदार प्रचार केला. घरोघरी जाऊन त्यांनी लोकांची भेट घेतली. अनेक भाजप (BJP) समर्थक पर्रीकर यांच्या पाठीशी उभे होते. मात्र पर्रीकर यांना बाबूश मोन्सेरात यांना हरवण्यात अपयश आले आहे. (Goa election result 2022 News updates)

Utpal Parrikar News |Goa election result 2022 News
AAP ठरणार मोठा पक्ष व्हीआयपी जागांवर कोण पुढे, कोण मागे?

शिवसेनेने उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. पणजीत पर्रीकर यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावला होता. आम आदमी पार्टीने देखील पर्रीकर यांना पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. प्रचारादरम्यान बाबूश मोन्सेरात यांनी विजय संपादन करण्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा अखेर खरा ठरला. पणजीच्या (Panaji) जनतेने मोन्सेरात यांना विजयी केले. भाजप समर्थक आणि नेते या निकालानंतर आनंद व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com