Pramod Sawant Voted  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले मतदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर फोन द्वारे संवाद साधला.

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा राज्यचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोठंबी येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्याआधी मुख्यमंत्री सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी श्री रुद्रेश्वर देवस्थानात प्रार्थना केली. त्यांचे वडील माजी झेडपी सदस्य पांडुरंग सावंत यांनी देखील मतदान केले आहे. (Goa Assembly Election 2022 Live Updates)

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, भाजपचे काम जनतेसमोर आहे. मला खात्री आहे की आम्हाला बहुमत मिळेल. मायकल लोबो आणि उत्पल पर्रीकर यांचा निवडणुकीत पराभव होईल. सावंत यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याबरोबर फोन द्वारे संवाद साधला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या. मला पूर्ण विश्वास आहे की भाजप गोव्यात 22+ जागा जिंकेल. भाजपने (BJP) 10 वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. याचा आम्हाला 100% बहुमत मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

गोवा राज्यचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी रिता श्रीधरन यांनी ताळगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 15 वर मतदान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल (Governor) म्हणाले, सर्व ठिकाणी सुरक्षित आणि सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. राज्यपाल यांनी गोव्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

SCROLL FOR NEXT