Churchill and Valanka Alemao Nomination for Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

बाणावलीतून चर्चिल तर नावेलीतून वालांकाची उमेदवारी दाखल

दोन्ही मतदारसंघात लोक बहुमताने निवडून देतील, आलेमावना विश्वास

दैनिक गोमन्तक

मडगाव : बाणावली मतदारसंघातून चर्चिल आलेमाव, नावेलीतून वालांका आलेमाव यांनी तृणमुलच्या, तर चर्चिलचे पुतणे युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळीतून काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी नावेलीचे अपक्ष जिल्हा पंचायत सदस्य सिप्रू कार्दोज यांनी वालांका आलेमाव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. (Goa Election News Updates)

बाणावली आणि नावेली या दोन्ही मतदारसंघातील लोकांनी आलेमाव कुटुंबाला नेहमीच प्रेम दिले आहे. हे मतदार यावेळीही आमच्या बरोबर राहतील आणि आम्हाला निवडून आणतील, असा विश्वास चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी व्यक्त केला. तर सिप्रू कार्दोज यांनी 2007 मध्ये नावेलीत चर्चिलच्या समर्थनार्थ जसे वारे निर्माण झाले होते तसेच आताही झालेले आहे, असा दावा केला.

दरम्यान आज बाणावली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेले आपचे व्हेंझी व्हिएगस यांनी बाणावलीच्या लोकांना चर्चिलपासून मुक्ती पाहिजे आणि या निवडणुकीत ती त्यांना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नावेलीतून भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले उल्हास तुयेकर यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही हो निवडणूक जिंकू, असे सांगितले.

कुंकळ्ळीतून काँग्रेस (Congress) उमेदवारीवर अर्ज भरलेले युरी आलेमाव यांनी काँग्रेसच गोव्याचे भवितव्य हे लोक जाणून असून कुंकळ्ळीत प्रचारात फिरताना आपल्याला जो प्रतिसाद मिळत आहे तो अफलातून असल्याचे सांगितले. तर अपक्ष उमेदवार संतोष फळदेसाई यांनी यावेळी आपणच बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला.

आज नुवे मतदारसंघातून बाबाशान डीसा (अपक्ष), राजू काब्राल (तृणमुल), कुडतरी मतदारसंघातून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Reginald Lorenco) (अपक्ष) व आंटोनियो पिशॉट (तृणमूल) तसेच वेळ्ळी मतदारसंघातून क्रूझ सिल्वा (आप) यांनी उमेदवारी अर्ज भरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT