Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजप कार्यकर्त्यांकडून विरोधी प्रचार, तरीही जिंकलोच : बाबूश मोन्सेरात

जेनिफर मोन्सेरात यांच्याविरोधातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याचा दावा

आदित्य जोशी

पणजी : भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला, मला मत दिलं नाही. मात्र तरीही मी निवडून आलो आहे. मी केलेलं काम पाहून लोकांनी मला निवडून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया पणजीतील भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केली आहे. काही निष्ठावान कार्यकर्ते आणि मतदारांमुळे आज आपल्याला विजय मिळाला असल्याचंही बाबूश यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला अजूनही स्वीकारलेलं आहे. मनोहर पर्रीकरांचा (Manohar Parrikar) वारसदार भाजप कार्यकर्ते आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे त्यांनी उत्पल पर्रीकरांचा प्रचार केला आणि त्यांनाच मत दिलं. ताळगाव मतदारसंघातही जेनिफर मोन्सेरात यांना भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मात्र आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडून आलो आहोत, असं बाबूश यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान ताळगावात (Taleigao) पहिल्यांदाच जेनिफरमुळे भाजपचा भगवा झेंडा फडकत असल्याचंही बाबूश यांनी सांगितलं.

दरम्यान मला नाकारणाऱ्या आणि माझ्याविरोधात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भाजपने शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे. आपल्याला भाजप कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असता तर जास्त मताधिक्याने निवडून आलो असतो असा दावा बाबूश यांनी केला आहे. तसंच भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी विरोधात कितीही काम केलं असलं तरीही भाजपच्या तिकीटावर निवडून आलो आहे. भाजपसोबतच राहणार असल्याचंही बाबूश यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

परंपरेच्या नावाखाली निष्पापांचा बळी! खतना विधीदरम्यान 41 तरुणांचा मृत्यू, पालकांच्या हलगर्जीपणावर संतापले मंत्री; 41 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जर्मनीत बँकेची भिंत फोडून चोरी केले 290 कोटी रुपये; ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केला होता मास्टर प्लॅन

'मासिक पाळी लपवू नका...!' वर्ल्डकप चॅम्पियन क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर उठलं वादळ; टीकाकारांना दिलं चोख प्रत्युत्तर

चुकीला माफी नाही! पडताळणीनंतर दोषी आढळणारे 'क्लब' कायमचे बंद करणार; CM प्रमोद सावंतांचा इशारा

Viral Video: 'कांड' करायला गेला अन् भलतचं होऊन बसलं! चिमुरड्याचा निशाणा चुकला आणि आजोबांना बसला जबरदस्त फटका; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

SCROLL FOR NEXT