Nitin Gadkari  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपच्या जाहिरनाम्याचे उद्या गोव्यात प्रकाशन

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते प्रकाशन होणार.

दैनिक गोमन्तक

पणजी: जनतेच्या सूचना, शिफारशी विचारात घेऊन तयार केलेल्या भाजपच्या संकल्पनाचे म्हणजेच विधानसभा निवडणूक 2022 जाहीरनाम्याचे प्रकाशन केंद्रीय महामार्ग मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते रविवारी 6 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. (Goa Assembly Election 2022)

पणजीतील (Panaji) एका तारांकीत हॉटेलात यासाठी एका सोहळ्याचे आयोजन भाजपने केले आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी यावेळी उपस्थित राहतील.

भाजपने राज्यातील जनतेकडून या जाहीरनाम्यासाठी सूचना, शिफारशी ई-मेल, व्हाट्सअप, संकल्प पेटी या माध्यमातून मागवण्यात आल्या होत्या. संकल्प रथही राज्यभरात फिरवण्यात आले होते. त्या शिफारशी व सूचना यांचा समावेश असलेला जाहीरनामा भाजपने (BJP) तयार केला आहे. त्याचे प्रकाशन आता करण्यात येणार आहे.

राज्यात अनेक कल्याणकारी योजना भाजप सरकारने राबवल्या आहेत. त्यामुळे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून कोणत्या नव्या योजना भाजपचे सरकार जनतेसमोर मांडणार आहे, याची उत्सुकता राज्यभरातील जनतेला आहे. राज्याच्या दौऱ्यावर रविवारी असलेले केंद्रीय मंत्री गडकरी हे सांगे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांच्या प्रचारासाठी दुपारी 4:30 वाजता सांगे येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

यानंतर केपे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या प्रचारासाठी ते सायंकाळी 5:45 वाजता केपे येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील.शिरोडा मतदारसंघातील उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारासाठी सायंकाळी सव्वा सात वाजता केंद्रीय मंत्री गडकरी जाहीर सभा घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

अग्रलेख: गोव्यात 'दरोडा' घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती बसणे शक्य आहे..

IFFI 2025: 'जागतिक सिनेमा गोव्‍यात अनुभवता यावा, हेच आमचे प्रथम लक्ष्‍य’! NFDCचे तांत्रिक विभागप्रमुख यादव यांचे स्पष्टीकरण

Illegal Fishing: भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी! अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT