J. P. Nadda Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपा हा सिद्धांतावर चालणारा पक्ष : जे. पी. नड्डा

प्रियोळ / कवळे / कुंभारजूवे येथे जाहीर सभा

दैनिक गोमन्तक

प्रियोळ / कवळे / कुंभारजूवे: सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च स्थानी नेणारा भाजपा हा एकच पक्ष आहे. हा सिद्धांतावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्याला उच्च स्थानी काम करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. नड्डा यांच्या आज प्रियोळ, कुंभारजूवे आणि कवळे येथे जाहीर सभा झाल्या.

नड्डा म्हणाले, देशातील इतर पक्षात केवळ फॅमिली राज सुरू आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आदी पक्षांची उदाहरण दिले. भाजपाने गेल्या दहा वर्षांत केलेला देशाचा आणि पर्यायाने राज्याचा केलेला विकास काँग्रेसला ६० वर्षात करता आला नाही. काँग्रेसच्या काळात देशातील लोक भ्रष्ट्राचार आणि घोटाळे यांस विटला होता. पण या सर्वांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाप लावला. केंद्र असो किंवा राज्य सरकारच्या सर्व सामाजिक योजनांचे पैसे आता थेट लोकांच्या खात्यात जमा होतात. यामुळे सगळी दलाली आणि मध्यस्थी संपुष्टात आली आहे.

प्रियोळ येथील सभेला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, केंद्रीय मंत्री दर्शना जर्दोष, उमेदवार गोविंद गावडे, जयेश नाईक, हेमाताई नाईक, जितेंद्र सिकेरकर, विठ्ठल नाईक, रुपेश रेडकर, हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी सदानंद शेट - तानावडे, दर्शना जर्डोष, गोविंद गावडे यांची भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Monsoon Update: पावसाचा दिलासा 22 जूननंतरच; राज्य हवामान विभागाचा अंदाज; आता पाणी जपूनच वापरा! धरणांतील पाणी आटल्‍यानं जलस्रोत खात्‍याला चिंता

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

SCROLL FOR NEXT