BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: भाजप उमेदवाराला केली धक्काबुक्की

पक्षाच्याच माजी पदाधिकाऱ्यांचे कृत्य

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुडतरीचे भाजपचे अधिकृत उमेदवार ॲन्थनी बार्बोझा यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून फातोर्डा पोलिसांनी कुडतरी भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष मयूर कुडचडकर यांच्यासह अमेय पराडकर आणि सैफुद्दिन या तिघांना अटक करून नंतर वैयक्तिक जामिनावर मुक्त केले.

यातील अमेय पराडकर हा भाजपच्या हाऊसिंग बोर्डमधील नगरसेविका पार्वती पराडकर यांचा मुलगा आहे. भाजपच्याच नगरसेवकांनी आपल्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारासाठी काम केल्याची तक्रार बार्बोझा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांच्याकडे केल्याची माहिती

त्यांनी दिली. त्यामुळे भाजपच्या (BJP) नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी काम न करता अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासाठी काम केले, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घोगळ येथे ही घटना घडली. बार्बोझा हे भावासोबत असताना त्यांना धक्काबुक्की केल्याची माहिती त्यांनी दिली. माझ्यावर सकाळीही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. आलेक्स रेजिनाल्ड हे जिंकत नाहीत, हे समजल्यावर संतापातून हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT