पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची यादी 19 जानेवारीला जाहीर करणार असल्याचं भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र काही जागांचा तिढा न सुटल्याने भाजपची यादी येण्यास वेळ लागला. अखेर भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. (Goa Assembly election2022: Goa BJP announced candidate list in Goa )
भाजपची (BJP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली.तृणमूल काँग्रेसवरही फडणवीसांनी थेट निशाणा साधला आहे. मगोपने तृणमूल काँग्रेससोबत केलेल्या युतीमुळे गोव्यात प्रचंड नाराजी आहे. नाराज नेत्यांनीही मगोप सोडून अन्य पक्षांची वाट धरल्याचं चित्र आहे.
अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) दिल्लीच्या धर्तीवर गोमंतकीय जनतेला दिलेल्या आश्वासनांचाही फडणवीसांनी समाचार घेतला. दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतील योजनांमुळेच घराघरात पाणी पोहोचलं आहे. यात आपचं कोणतही श्रेय नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आपने गोव्यात येऊन कितीही आश्वासनं दिली तरी गोमंतकीय जनतेला त्यांचं सत्य माहित आहे. गोमंतकीय जनतेसाठी भाजपने खूप विकासकामं केली आहेत. मनोहर पर्रीकरांनी (Manohar Parrikar) भाजपच्या माध्यमातून गोव्याचा विकास केला आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भाजपची उमेदवारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे
साखळी - प्रमोद सावंत
मांद्रे - दयानंद सोपटे
पेडणे - प्रवीण आर्लेकर
थिवी - नीलकंठ हळर्णकर
म्हापसा - ज्योशुआ डिसोझा
शिवोली - दयानंद मांद्रेकर
साळगाव - जयेश साळगावकर
पर्वरी - रोहन खंवटे
हळदोणा - ग्लेन टिकलो
पणजी - बाबूश मोन्सेरात
ताळगाव जेनिफर मोन्सेरात
सांत आंद्रे - फ्रान्सिस्को सिल्व्हेरा
मये - प्रेमेंद्र शेट
पर्ये - दिव्या विश्वजीत राणे
वाळपई - विश्वजीत प्रतापसिंग राणे
प्रियोळ - गोविंद गावडे
फोंडा - रवी नाईक
मडकई - सुभाष भिंगी
शिरोडा - सुभाष शिरोडकर
मुरगाव - मिलिंद नाईक
वास्को - कृष्णा साळकर
दाबोळी - मॉविन गुदिन्हो
नुवे - दत्ता विष्णू बोरकर
फातोर्डा - दामोदर नाईक
मडगाव - मनोहर उर्फ बाबू आजगावकर
बेणावली - दामोदर बांदोडकर
नावेली - उल्हास तुवेकर
कुंकळ्ळी - क्लाफासियो डायस
वेली - साविओ रॉड्रिग्ज
केपे - चंद्रकांत कवळेकर
कुडचडे - निलेश काब्राल
सावर्डे - गणेश गावकर
सांगे - सुभाष फळदेसाई
काणकोण - रमेश तवडकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.