BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'डिचोलीत भाजपचाच वरचष्मा'

घसरलेली टक्केवारी भविष्यात आव्हान ठरणारी

दैनिक गोमन्तक

पणजी: डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातील निकाल ''गोमन्तक''च्या अंदाजानुसार लागले आहेत. डिचोली मतदारसंघात मावळते सभापती राजेश पाटणेकर यांची झालेली अवहेलना पक्षाला महागात पडेल असा स्पष्ट इशारा ''गोमन्तक''ने दिला होता. शेवटच्या क्षणी पाटणेकर यांना राजी केले गेले. तरी व्हायचे ते नुकसान त्याआधीच झाले होते. शेवटच्या काही दिवसात पक्षाने ‘व्हिटामीन एम’ भरपूर प्रमाणात वापरले. पण बेरकी मतदारांनी दारी आलेल्या लक्ष्मीला स्वीकारत अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात मते टाकली. राजेश पाटणेकर या लढतीत तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. हा भाजपासाठी इशाराच आहे. चंद्रकांत शेट्ये यांचा राजकारणातली उदय पराभूत उमेदवार नरेश शेट्ये यांच्याही उमेदवारी पाणी फिरवून गेला.

विखुरलेल्या विरोधकांमुळे मये मतदारसंघात भाजपला झुकते माप मिळेल, हा अंदाजही खरा ठरला. संतोष सावंत यांनी गोवा फॉरवर्डतर्फे अनेक गावांतून बराच जोर लावला होता. पण भाजपची उच्चस्तरीय यंत्रणा भारी ठरली. मगोपकडे गेलेले प्रविण झांट्ये साडेतीन हजार मतांचाही पल्ला गाढू शकले नाहीत, आरजीचे श्रीकृष्ण परब यांना त्यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. यावरुन इथल्या मतदानातल्या प्रगल्भतेचा अंदाज येतो. मतदारांनी राजेश कळंगुटकर (आप) आणि मिलिंद पिळगावकर (अपक्ष) यांचा दारुण अपेक्षाभंग केला.

भाजपाची मते फोडण्याचे श्रेय झाट्ये, कळंगुटकर व पिळगावकर यांना जाते. तिघांना मिळून 7575 मते मिळाली तर प्रेमेंद्र शेट यांना 7636. मये हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करतानाच इथला मतदार जातीच्या निकषांपल्याड जावूनही मतदान करतो हेच या निकालाने दाखवून दिले आहे.

90 टक्के मतदानाचा विक्रम करणाऱ्या साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना घेरण्याची विरोधकांची रणनिती अपयशी ठरली. 2016 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची कोंडी झाली तशी सावंतांची होऊ नये म्हणून भाजपने अगदी ‘पन्ना’ पातळीवरही बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या परप्रांतातील नेत्यांची फौज तैनात इथे केली होती. भाजपने इथे ‘मनी पॉवर’चाही सढळ हस्ते वापर केला.

तरीही सावंत यांना केवळ 666 मतांची आघाडी मिळवता आली. एकूण मतदानाचे 47 टक्के मतदान त्यांच्या बाजूने झाले. 740 मते मिळवणाऱ्या रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे सुजय गावस यांनी सावंत यांची पत राखली. 361 मते मिळवणारे महादेव खांडेकर आणि 108 मते मिळवणारे मनोजकुमार घाडी यांना मतदाराने त्यांची पत दाखवून दिली साखळी मतदार संघातील संघटनात्मक कार्याचा फेरविचार भाजपाला करावा लागणार आहेच.

शिवाय खाणबंदीवर तोडगा काढताना फसवी आश्‍वासने न देता स्थानिकांना रोजगार पुरवणारे पर्याय शोधायची वेळ आल्याचेही हा निकाल सांगतो. डिचोलीचे नवनियुक्त आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये भाजपाबरोबर असल्याचे विधान मावळते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेय. त्या अर्थाने पाहिल्यात हा संपूर्ण तालुका पूर्ववत भाजपाकडे राहिला आहे. मात्र, घसरलेली टक्केवारी भविष्यातले आव्हान ठरणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT