Bala Bhegade of Maval is responsible for electing Goa Chief Minister Pramod Sawant

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

मुख्यमंत्री प्रमोद सावतांना निवडून आणण्याची जबाबदारी मावळच्या बाळा भेगडेंवर

Priyanka Deshmukh

गोवा विधानसभेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत होण्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यात भाजपची सत्ता राखण्यासाठी आतापासून पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा दौऱ्यातही वाढ होत आहे. आता गोव्यात सत्ता राखण्यासाठी त्यांनी आपल्या `टीम गोवा`मध्ये (Team Goa) महाराष्ट्राचे माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना घेतले आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघाचे प्रभारी म्हणून त्यांनी नेमणूक करण्यात आली. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील अनुभवाचा वापर करुन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही एकहाती विजय मिळवून देणार, अशी प्रतिक्रिया भेगडे यांनी दिली आहे.

मगो (MGP) पक्षाने सोडलेली साथ, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवालांमुळे यावेळी गोव्यात भाजपची वाट थोडी बिकट झालेली दिसत आहे. या दोन मुख्यमंत्र्यांच्या 'टिएमसी' (TMC) आणि `आप` (AAP) या दोन पक्षांनी भाजपपुढे (BJP) मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे भाजप सावध होऊन निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच स्वत:हून गोवा निवडणुकीमध्ये (Goa Election) लक्ष घातले आहे. त्यांनी गोव्यात टीम फडणवीस बरोबर मोठी बैठक घेतली. या बैठकीला भेगडेंही (Bala Bhegade) उपस्थित होते. टीम फडणवीसमधील प्रत्येक नेत्याला गोव्यातील एकेका मतदारसंघाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

त्यापैकी भेगडेंकडे सर्वात मोठी म्हणजे मुख्यमंत्री सावंतांच्याच मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे संघटनकौशल्य आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत प्रभारी म्हणून त्यांनी केलेली दाखविलेली दमदार कामगिरी पाहून त्यांना गोव्यातही अशीच काहीशी धूम ठोकायची आहे म्हणून पक्षाने त्याच्यावर हि जबाबदारी सोपविली आहे. गोव्यात 40 मतदारसंघ असले,तरी सर्वांचे लक्ष `साखळी` (Sanquelim) कडेच असणार आहे. कारण तो मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. तेथून सावंत दोनदा निवडून आले आहेत. एकूणच गोव्यातील सर्व मतदारसंघातील मतदारसंख्या महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असली तरी या निवडणुकीत मतदारांना मतदान करतांना विचार कारावा लागणार आहे. साखळीत फक्त तीस हजार मतदारांची संख्या आहे. यापुर्वी डॉ.सावंत (Pramod Sawant) हे तीन हजारांच्या लीडने निवडून आले होते. यावेळी मात्र ते हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. आणि ती ते करणार की भेगडे ती करून देण्यात यशस्वी होणार याकडे संपूर्ण गोवेकरांचे लक्ष असणार आहे. दरम्यान,`साखळी`चे प्रभारी म्हणून नियुक्ती होताच गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा भेंगडे यांनी केला आहे. आता तो विश्वास कितपत खरा ठरतो हे तर येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) निकालावरूनच कळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT