Babush Monserrate
Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा निवडणूक

खरी कुजबूज! ...मोन्सेरात यांची धाकधूक

दैनिक गोमन्तक

गिरीश चोडणकर पंजाबच्या वाटेवर असता नवी दिल्लीत भाजपच्या सिद्धार्थ कुंकळयेकर व इतर काही कार्यकर्त्यांना भेटले. तेथे त्यांनी सेल्फी काढून घेतली. वर लिहिले - ‘आम्ही गोवेकर आहोत’ (आणि निवडणुकीनंतर मिठ्या मारून फोटो काढू शकतो.)

यांना आता आवरा

निवडणुकीचे पडघम जरी शांत झाले असले तरी उमेदवार असलेल्याची धाकधूक वाढली आहे. कोण काठावर आहे तर कोण तळाशी असल्याचा अंदाज बांधला जात असल्याने अजूनही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदान केलेले नाही त्यांचा भाव बराच वधारला आहे. एका पोस्टल मतासाठी पाच हजार, दहा हजार, वीस हजार अशी पावणी सुरू झाली आहे. हे आहे सरकारी कर्मचारी. लोकशाही वाचवा म्हणून हेच गावात मिरवणूक काढतात आणि आता पैशांसाठी (Money) लोकशाहीचे धिंडवडे काढतात. या प्रकाराला सरकारच जबाबदार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे. जर या कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी आपले मत पेटीत टाकण्याचा आदेश दिला असता तर लोकशाहीची थट्टा झाली नसती. सरकार आता तरी जागा होणार काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. (Goa Politics)

कॉंग्रेस-भाजपा झिंदाबाद!

गिरीश चोडणकर पंजाबच्या वाटेवर असता नवी दिल्लीत भाजपच्या सिद्धार्थ कुंकळयेकर व इतर काही कार्यकर्त्यांना भेटले. तेथे त्यांनी सेल्फी काढून घेतली. वर लिहिले - ‘आम्ही गोवेकर आहोत’ (आणि निवडणुकीनंतर मिठ्या मारून फोटो काढू शकतो.) वास्तविक आम आदमी पक्ष हे नेहमी अधोरेखित करीत आला आहे, कॉंग्रेस आणि भाजपा दोघेही एकमेकांचे साथीदार आहेत. सध्या गोव्यातील अनेक नेतेगण वेगवेगळ्या राज्यात प्रचारासाठी चालले आहेत. तेथे या लोकांना कोण भाव देतो कुणाला ठाऊक. भाजपाही (BJP) म्हणे पंजाबमध्ये चालली आहे. तेथे असा फोटो प्रसिद्ध झाला तर दोघांच्याही अंगलट येईल. भाजपाबरोबरचे संबंध तेथे शिरोमणी अकाली दलाने कधीच तोडून टाकले आहेत. ∙∙∙

गरिबांना वाली कोण?

आजच्या युगात गरीबाला वाली उरला नाही म्हणतात, ते काही खोटे नाही. गोव्यात अशी अनेक कुटुंबीय आहेत ज्याच्या घरात दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण. अनेक कुटुंबाचा आधार पेन्शन आहे. मात्र, तीच पेन्शन जर सरकारी कागदी घोड्यात अडकूनन पडली तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत दरवर्षी पेन्शन प्राप्त करण्यासाठी हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. गोव्यातील अनेक पेन्शन त्याप्रमाणे हयात असल्याचा दाखला देत असतात. मात्र, योग्य त्या यंत्रणेकडून त्यांच्या पर्यंत तो पोहोचत नाही आणि त्याचा नाहक त्रास गोरगरीब जनतेला भोगवा लागतो. एका महिलेने आपला हयात असल्याच्या दाखल नोव्हेंबर महिन्यात काढला; मात्र संबंधित अधिकाऱ्याला हा दाखला डिसेंबरमधील हवा आहे. या महिलेने हा दाखला एका बॅंकेत काढला होता. मात्र, संबंधित अधिकारी येथे काढलेला दाखला चालणार नाही असे सागितले जाते. त्या संस्थेमार्फत काढावा असे सूचवत आहे त्याच संस्थेतून काढलेला हयात दाखलाच कसा काय चालतो असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही पेन्शनधारक असे आहेत ज्यांच्या पेन्शन केवळ कागदी घोड्यांमुळे व संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अडकून आहेत.

पैसे केले गायब

उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचे रान केले. पैशाचा चुराडा केला. पण, प्रत्यक्ष पैसे मतदारांना पोहचले नाहीत. सफेद पाकीटबंद लिफाफ्यात प्रति मतदार दोन हजार रुपये याप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांजवळ पाठवून दिले. पण, हवा तशी जोरात आहे हे समजल्या बरोबर काही कार्यकर्त्यांनी त्या लिफाफ्यामधील हजार, पाचशे गायब करून काहींना दीड हजार तर काहींना हजार रुपये दिले. आता खरंच लिफाफा दिला काय? याची पडताळणी करण्यासाठी एक महिला कार्यकर्ती प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पाहणी करीत होती आणि त्या पाकिटात किती आहे हे खात्री करण्यासाठी पाकीट उघडून पहाणी केली असता दोन हजार रुपयांच्या जागी एक हजार रुपये असल्याचे उघड झाल्यामुळे आपल्या भाईने मतदारांना दोन हजार पाठविले होते त्यातील हजार गायब झाल्याचे पाहून भाई आणि महिला कार्यकर्ती गारद झाली आहे. अजून निकाल बाकी आहे पाहुया कोणाला झटका बसतो तो, अशी चर्चा सांगे मतदार संघात सुरू झाली आहे.

प्रियोळात ‘पाकिटमार’

मागच्या निवडणुकीत (Election) गोविंद गावडे यांचे समर्थक दीपक ढवळीकरांच्या समर्थकांना ‘पाकिटवाले’ म्हणून हिणवत होते. पण, या निवडणुकीत गोविंद गावडे समर्थकानांही ‘पाकिटाचा’ आधार घ्यावा लागला. परिणामी, प्रियोळात दोन्ही बाजूंनी अक्षरशा ‘पाकिटांचा’ पाउस पडला. आता पाऊस पडला की त्या पाण्याने हात धुवून घेणारे आलेच. या दोन्ही उमेदवारांनी समर्थक पंच सदस्याकडे सोपविलेल्या पाकीटातील दोन हजारांना गळती लागून प्रत्यक्ष मतदाराच्या हातावर फक्त पाचशे रुपये पडले. असे केलेल्या पंचाना आता ‘पाकिटमार’ असे नवे नाव पडले आहे व यांनी आपल्या आगामी पंचायत निवडणुकीसाठी चांगला ‘पुरुमेत’ करून ठेवला आहे, असा प्रियोळात बोलबाला आहे. ∙∙∙

मोन्सेरात यांची धाकधूक

पणजी व ताळगाव मतदारसंघातील मतांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक चाणक्य बाबुश मोन्सेरात यांनी नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. निवडणूक कशा जिंकायचा याबद्दल तरबेज असलेले मोन्सेरात यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी किती मते मिळतील याचा तक्ताच आपापल्या वाड्यावर झालेल्या मतांद्वारेच दिला आहे. त्याचा अंदाज घेता या दोन्ही मतदारसंघात मोन्सेरात आरामपणे जिंकून येतील असाच अंदाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असला तरी मोन्सेरात हे समाधानी नाहीत. नेहमीच्या निवडणुकीप्रमाणे ते सुरक्षित आहेत असे सांगत असले तरी त्यांच्या मनात या दोन्ही मतदारसंघाबद्दल धाकधूक आहे. मतदारांनी भाजपला स्वीकारला आहे का या संभ्रमात ते आहेत. वैयक्तिक मते त्यांची आहेत. मात्र पक्ष बदलल्याने व काही कार्यकर्ते सोडून गेल्याने त्याचा फरक या निवडणुकीवर होऊ शकतो. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT