आतापर्यंत गोव्यातील राजकीय पक्षांनी जनतेचा अपेक्षाभंगच केला!

भ्रष्टाचाराचा कळस : ‘गोमन्तक’ टीव्हीच्या चर्चेत वक्त्यांचा सूर
Panaji, Goa
Panaji, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील राजकीय पक्ष मग तो राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष, या सर्वांनी गोव्याच्या जनतेचा अपेक्षाभंगच केला अशा आशयाचा सूर जवळपास सगळ्याच वक्त्यांनी व्यक्त केला. गोमन्तक टीव्हीच्या ‘सडेतोड नायक’ हा कार्यक्रम बुधवारी मडगावच्या आना फोंत उद्यानात घडवून आणला. यावेळी झालेल्या चर्चेत गोव्यातील एकाही पक्षाने खऱ्या अर्थाने गोवेकरांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले नाहीत, अशी खंत व्यक्त करण्यात आली. (Goa News)

Panaji, Goa
गोवा ठरलं 100% लसीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य

या चर्चेत युगोडेपाचे उपाध्यक्ष राधाराव ग्रासीयस, राजकीय विश्लेषक क्लिओफात कुतिन्हो, महिला चळवळीच्या नेत्या आवदा व्हिएगस, पर्यावरण कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई, झरीना डिकुन्हा, सामाजिक भाष्यकार डॉ. मुकुल पै रायतुरकर, जुझे मारिया मिरांडा, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेशा सिंगबाळ, भाजपचे संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले जगदीश प्रभुदेसाई, भाजपचे नेते भाई नायक, मगोचे सुदेश मळकर्णेकर, ‘गोमन्तक’चे ब्युरो प्रमुख सुशांत कुंकळयेकर तसेच संघाचे माजी कार्यकर्ते अभय खवंटे यांनी भाग घेतला होता. ही चर्चा गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक यांनी संचलित केली.

नायक यांनी सध्याच्या सरकाराबद्दल मत विचारले असता, या सरकारच्या (Government) काळात भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाने कळस गाठला असे मत कुतिन्हो यांनी व्यक्त केले. तर भाई नायक यांनी भाजपातील काही मंत्र्यांनी गोव्याचा विकास करण्याच्या नावाखाली स्वतःचाही विकास केला असा टोमणा मारला. या सरकारने सर्वांचाच अपेक्षाभंग केला असे मत झरीना डिकुन्हा व अन्वेशा सिंगबाळ यांनी मांडले.

Panaji, Goa
गोमेकॉतील नोकर भरतीचे भवितव्य खंडपीठाच्या निकालावर अवलंबून

डॉ. रायतुरकर म्हणाले, मागच्या 10 वर्षात भाजपने गोव्यात फक्त गैरव्यवस्थापनाचा कळस गाठला. तर अभिजीत प्रभुदेसाई यांनी या सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणावर घाला घातला असा आरोप केला. जगदीश प्रभुदेसाई यांनी पर्रीकरांनंतर भाजपकडे नेतृत्वाचा अभाव दिसून आला, असे मत व्यक्त केला.

गोव्याचे प्रश्न समर्थपणे सोडवायला हवेत!

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस (Congress) पक्षाने जे काम करायला पाहिजे होते ते त्यांनी कधी केलेच नाही आणि प्रादेशिक पक्षही गोव्याचे प्रश्न समर्थपणे पुढे आणायला कमी पडले असे मत रायतुरकर यांनी मांडले तर मतदारच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे त्यामुळे निवडून येणारेही तसेच होणार हे उघड आहे, असे मत व्यक्त करताना माजी आमदार राधाराव ग्रासीयस यांनी आता येणारे सरकार कुणाचेही असो ते पूर्वीप्रमाणेच भ्रष्ट असेल असे मत व्यक्त केले. लोक चांगल्या माणसांना निवडून देत नाहीत हा आपला अनुभव असल्याचे ते म्हणाले. महिलांचे (Women) प्रश्न घेऊन लढणाऱ्या आवदा व्हिएगस यांनी राजकीय पक्ष महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व देत नाहीत, अशी खंत व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com