Arvind kejriwal said Goa is a first class state with absolutely third-class politicians

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

फर्स्ट क्लास राज्यावर थर्ड क्लास राजकारण्यांची सत्ता; केजरीवालांचा घणाघात

गेल्या 60 वर्षांत या पक्षांनी तुम्हाला भ्रष्टाचाराशिवाय काय दिले आहे?

Priyanka Deshmukh

गोव्यातील राजकीय घडामोडींना दिवसेंदिवस वेग येतो आहे. गोव्यात प्रचार आणि सभा सुरू झाल्या आहे. काल गोव्यात प्रचारादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) म्हणाले की, गोवा हे प्रथम दर्जाचे राज्य (Goa First Class State) आहे, परंतु येथे तृतीय दर्जाचे नेते आहेत. यावेळी केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकारची हमी गोव्यातील जनतेला दिली.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीला (Goa Assembly Election) अवघा काही अवधी शिल्लक राहिला आहे. सर्वच पक्ष प्रचारात गुंग झाले आहेत आणि जोमाने प्रचार करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही गोव्यातील राजकारणामध्ये मागे नाहीत. यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्व 40 जागा लढवण्याची घोषणा करणाऱ्या केजरीवाल यांनी सोमवारी मोठे विधान केले. आणि त्याआधी त्यांनी गोव्यातील जनतेला अनेक आश्वासनही दिले.

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, "मला वाटते की गोव्यात अधिक चांगल्या पात्र राजकारण्यांची गरज आहे. गेल्या 60 वर्षांत या पक्षांनी तुम्हाला भ्रष्टाचाराशिवाय काय दिले आहे? असा सवाल करत, आमचा पक्ष गोव्यात पहिले भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करेल, असे आश्वासन केजरीवालांनी गोमंतकीयांना दिले.

विशेष म्हणजे गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या जवळपास दोन महिने आधीच अनेक नेत्यांचा भ्रमनिरास होतांना दिसत आहे. त्यामुळे पक्षांतरण वाढले आहे. मंगळवारी भाजपचे आमदार कार्लोस आल्मेडा यांनी आमदारकी सोडून पक्ष सोडला. याआधी लुइझिन फालेरो, रवी नाईक, अॅलेक्सो रेजिनाल्डो या सर्व कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीचे जयेश साळगावकर, अपक्ष आमदार रोहन खवंटे आणि भाजपच्या आमदार अलिना साल्डाणा यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे गोव्यात राजकीय नेत्यांच्या पक्षांतराचा निवडणूकीवर काय परिणाम दिसून येईल औत्सुक्याचे असणार असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT