मांद्रे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस बोलताना.  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa: नवा विक्रम करणार अशी घोषणा करावी; देवेंद्र फडणवीस

सभागृहासह बाहेर चारशे पाचशे लोक होते. हे वक्त्यानी मान्य करून ही प्रचार सभाच असल्याचे दाखवून दिले. उद्या निवडणूक झाली तरी भाजपा निवडणून येईल असे फडणवीस यांनी जाहीर केले.

दैनिक गोमन्तक

मोरजी: उमेदवारी अजून खुद्द मुख्यमंत्री (CM) डॉक्टर प्रमोद सावंत यांची जाहीर झालेली नाही ती उमेदवारी जाहीर कण्यासाठी एक उच्च्स्थरीय पार्लमेंटरी समिती आहे ती जाहीर करणार, सर्व भाजपा नेत्यांनी जे कोणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांनी केवळ भाजपासाठी (BJP) काम करावे, आमदार दयानंद सोपटे यांनी उमेदवारीची चिता करण्यापेक्षा मतदार संघातून मोठा मतांचा विक्रम घडवून आणणार अशी घोषणा करावी असे आवाहन भाजपा गोवा निरीक्षक आणि महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी मांद्रे मतदार संघातील हजारो भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना केले.

मांद्रे दीनदयाल सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला एक प्रकारे आमदार दयानंद सोपटे यांनी शक्ती प्रदर्शन करून आपल्यासोबत भाजपाचे 90 टक्के कार्यकर्त्ये समर्थक आणि मतदार असल्याने उमेदवारी हि आपल्यालाच मिळावी यासाठी हा मेळावा महत्वाचा ठरला आहे. उमेदवारीची घोषणा होईल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती मात्र प्रवक्त्यांनी गुगली टाकत उमेदवारीची चिता करू नका , भिवपाची गरज ना, आमदार सोपटे यांनी नवीन विक्रमाची घोषणा करावी असे वक्त्यव्य करून उमेदवारी कुणाला हा निर्णय गुलदस्त्यात ठेवण्यात आला.

सभागृहासह बाहेर चारशे पाचशे लोक होते. हे वक्त्यानी मान्य करून ही प्रचार सभाच असल्याचे दाखवून दिले उद्या निवडणूक झाली तरी भाजपा निवडणून येईल असे फडणवीस यांनी जाहीर केले. हे वक्त्यानी मान्य करून ही प्रचार सभाच असल्याचे दाखवून दिले उद्या निवडणूक झाली तरी भाजपा निवडणून येईल असे फडणीस यांनी जाहीर केले.

सभा संपल्यानंतर मान्यवर जसे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) चे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या सत्कार सोहळ्याला हरमलमध्ये गेले तसेच आमदार दयानंद सोपटे हेहि तिथ उपस्थित होते, निमंत्रण पत्रिकेवर आमदार दयानंद सोपटे यांचे नाव नव्हते मात्र निमंत्रण पत्रिका त्याना देण्यात आली, कार्यक्रमाला पोचले असता त्यानाही व्यासपीठावर आसन देण्यात आले.

स्थलातरीत पक्ष

देवेंद्र फडणीस यांनी पुढे बोलताना सध्या बाहेरून अनेक प्रकारचे पक्ष येतात त्यांची खिल्ली उडवताना हे स्थलांतरित पक्ष आहे जशे स्थलांतरित काही काळासाठी पक्षी येतात तसे हे पक्ष आहेत.

आम आदमीला काय काम आहे?

आम आदमी पक्षाच्या सरकारला दिल्हीत केवळ. शिक्षण, आरोग्य हीच कामे करायची आहे गटारे तर महा नगरपालिका ज्या भाजपाच्या आहेत त्या बांधत असतात असा दावा केला.

एकत्रित नांदा

भाजपाचे सर्व इच्छुक उमेदवार किंवा पक्षापासून दूर आहेत त्यांनी एकत्रित येवून काम केवळ भाजपासाठी करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्यावर गोमंतकीय जनतेवर विश्वास असल्याने आगामी निवडणुकीत भाजपाच सरकार सत्येवर येईल असे सांगितले.

भाजपा सरकारच येईल ; श्रीपाद नाईक

केंद्रात (Central) आणि राज्यात भाजपा शिवाय पर्याय नसल्याने आगामी निवडणुकीत भाजपाचे पूर्ण बहुमतांनी सरकार सत्येवर येईल असा विश्व केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. जनतेने भाजपावर विश्वास ठेवला आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावर हा पक्ष उभा आहे. भाजपला कुणीही आव्हान देवू शकत नाही, भाजपा कार्यकर्त्यांनी चळवळ उभी करून राजकीय सत्ता बदल करण्याच्या भावनेने भाजपा कार्यकर्त्यांनी बदल घडवून आणला आणि त्याच बळावर आजही पक्ष अखंडित कार्य करत असल्याचे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

विरोधी दिशाहीन पक्ष; मुख्यमंत्री डॉक्टर सावंत

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बोलताना 2020 च्या निवडणुकीत भाजपा पूर्ण बहुमतांनी विजयी होणार आहे त्यासाठी कुणीच भिवपाची गरज ना असे सांगून विरोधी पक्ष आहेत ते दिशाहीन पक्ष आहेत त्यांच्याकडे कोणतेच विजन नाही असा दावा करून त्यांची सकाळ कधी होते ते कळत नाही. सर्व पक्षाचे नेते केवळ मुख्यमंत्री आपण आहे म्हणून शिव्या देतात सर्व पक्ष एकत्रित आले तरी भाजपला हरवणे या जन्मी त्याना शक्य होणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी केला,

मगोचा सिह तृणमूल मध्ये जाईल

सध्या मान्द्रेत सिहाचे शेले गळ्यात घालून फिरतात तेच उद्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये असतील असा दावा मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी केला. या वेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे, मांद्रे भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर, भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, सरचिटणीस संतोष कोरखणकर भाजपा महिला नयनी शेटगावकर, तारा हडफडकर, दीपा तळकर, प्राजक्ता कान्नायिक, एकता चोडणकर, मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, तुये सरपंच सुहास नाईक, गोविंद आजगावकर, अनंत गडेकर, कविता तुयेकर, रामा नाईक, पर्से सरपंच प्रगती सोपटे, दत्ताराम ठाकूर, अनिशा केरकर, मधु कानोलकर. डेनिस ब्रिटो. राजन फरास, हरमल सरपंच मनोहर केरकर, बाबली रावूत, जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, शिल्पा नाईक, गुरुदास सोपटे महानंदू अस्नोडकर, आगरवाडा सरपंच भगीरथ गावकर, विर्नोडा सरपंच अपर्णा परब शिवाय नऊही पंचायत क्षेत्रातील उपसरपंच पंच सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सदानंद तानावडे, अनंत गडेकर मधु परब आदींची भाषणे झाली. सुदेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT