Pratap Singh Rane  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

प्रतापसिंग राणे यांच्या आजीवन कॅबिनेट दर्जाला ॲड. रॉड्रिग्ज यांचा आक्षेप

अधिसुचना मागे घ्या : ॲड. रॉड्रिग्ज यांची मुख्य सचिवांकडे मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी मुख्यमंत्री व आमदार प्रतापसिंग राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याच्या अधिसूचनेविरोधात ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी राज्याचे मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही अधिसूचना मागे घेण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. ती अधिसूचना मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात (High Court) जाण्याचा इशारा दिला आहे.

प्रतापसिंग राणे (Pratap Singh Rane) यांना आजीवन मंत्रिमंडळ दर्जा देण्याबाबत यावर्षी 7 जानेवारी रोजी राज्य सरकारने अधिसूचना जारी केली होती. ही अधिसूचना अधिसूचना पूर्णपणे बेकायदेशीर, अधिकारक्षेत्राशिवाय स्पष्टपणे असंवैधानिक आणि अधिकाराचा दुरुपयोग केला असल्याचे ॲड. रॉड्रिग्ज यांनी या नोटिशीद्वारे निदर्शनास आणून दिली आहे. हा अभूतपूर्व आजीवन मंत्रिमंडळाचा दर्जा हा राज्याच्या तिजोरीवर अवास्तव मोठा आर्थिक बोजा आहे. मंत्रिमंडळ दर्जामुळे प्रतापसिंग राणे हे कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीने अधिकृत कार, कार्यालय आणि इतर सर्व फायदे याशिवाय डझनभर कर्मचाऱ्यांचे हक्कदार आहेत.

आजीवन मंत्रिमंडळ दर्जा देणे हे भारतीय राज्यघटनेची फसवणूक आहे कारण ते घटनेतील 91 व्या दुरुस्तीच्या भावना आणि हेतूचे उल्लंघन करते. हा आजीवन मंत्रिमंडळ दर्जा कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी तिजोरीला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने राजकीय हेतूने सध्याच्या सरकारने घाईघाईने आणि विचार न करता तो प्रदान केला आहे हे सर्वज्ञात सत्य आहे, असे नोटिशीत म्हटले आहे.

..तर या निर्णयाचा करदात्यांवर पडेल बोजा

सरकारने कॅबिनेट दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय कोणत्याही निकषावर आधारित नसून, त्याऐवजी सरकारमधील (Government) सत्ताधारी पक्षाकडून मिळालेल्या किंवा त्यांच्या अपेक्षेने मिळालेल्या उपकारांची ही परतफेड आहे. राज्याची तिजोरी रिकामी असतानाही, सरकारने कायद्याचे उल्लंघन करून प्रतापसिंग राणे यांना आजीवन मंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबत घेतलेला निर्णय करदात्यांवर बोजा टाकणारा आहे, असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: हा नवरा आहे की सैतान? पत्नीची बोटं कापली, शीर धडावेगळं करुन फ्रिजमध्ये ठेवलं, मृतदेह खोलीतच सडत ठेवला; 25 वर्षीय 'रिया'ची निर्घृण हत्या

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

SCROLL FOR NEXT