गोव्यातील एसीजीएल कंपनीच्या कामगार पगारवाढ करारावर 8 मार्चला होणार सह्या

कामगार आयुक्तांची भुमिका ठरली निर्णायक
Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak | ACGL worker Salary Issue Marathi news
Published on
Updated on

पिसुर्ले: गेल्या चार वर्षांपासून रेंगाळत असलेला एसीजीएल कामगार पगारवाढीच्या मुद्द्यावर काल रात्री उशिरा कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मध्ये पगारवाढ व इतर विषयांवर एकमत झाल्याने बऱ्याच दिवसांपासून ऐरणीवर आलेला हा विषय संपुष्टात आला आहे. या संबंधी आज सकाळी कामगार संघटनेचे तसेच मनसे कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी भुईपाल सत्तरी येथिल बीबीडी विभागात येऊन सर्व कामगारांना गेल्या तीन चार दिवसांत घडलेल्या सर्व घडामोडी संदर्भात सविस्तर माहिती देऊन पगारवाढीच्या करारांवर आठ मार्च रोजी सह्या होणार असल्याचे या वेळी सांगितले, असे काही कामगारांना समजले आहे.

Pramod Sawant
Weather Updates: गोवेकरांना उन्हाळ्याची झळ बसणार; हवामान खात्याचा अंदाज

पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा औद्योगिक वसाहतीत सुमारे चार दशकांपासून कार्यरत असलेल्या एसीजीएल कंपनीचे या भागाच्या विकासासाठी महत्वाचे योगदान आहे, त्यात या भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, परंतू औद्योगिक क्षेत्रात येत असलेल्या चढ उतार समस्येमुळे सदर कंपनीच्या कामगाराचा पगारवाढ विषय सन 2018 पासून रेंगाळत होता, त्यामुळे कामगार संघटना आणि कंपनी (Company) व्यवस्थापन यांच्या मध्ये तेढ निर्माण झाला होता आणि त्यामुळे सदर कंपनीच्या कामगार संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपूर्वी दि 2 मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस दिली होती. यामुळे या संपाचा काय परिणाम होणार या संबंधी कामगारा बरोबर नागरिकांमध्ये सुद्धा शंका निर्माण झाली होती. (ACGL worker Salary Issue News)

Pramod Sawant
युक्रेनमधून आतापर्यंत 7 विद्यार्थी गोव्यात दाखल

परंतु या प्रकरणी संपावर जाण्याची मुदत जवळ येताच काही कामगार नेत्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केल्याची दखल घेऊन त्यांनी या प्रकरणी राज्य कामगार आयुक्तांना आदेश देऊन कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या मध्ये समझोता घडवूण आणण्याचा प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन कंपनीने कामगारांच्या पगारवाढ संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला व त्याला कामगार संघटनेच्या वतीने सहमती दर्शवली असल्याने हा विषय संपुष्टात आला आहे. (Goa Marathi News update)

या संबंधी कामगार संघटनेच्या वतीने अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, या संदर्भात खास सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले आहे की कंपनीच्या वतीने सन 2018 पासून चार वर्षांसाठी 5500 पगारवाढ व त्याप्रमाणे मागील थकबाकी व इतर सुविधा, त्याच प्रमाणे पुढील पगारवाढ करार दोन वर्षाचा असणार आहे व त्यापुढील करार ठरल्या प्रमाणे तीन वर्षाचा असणार आहे. या करारावर आठ मार्च रोजी दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी करण्यात येणार असल्याचे काल रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, तसेच कंपनीचे सीईओ ओ. व्ही. अजय, सी. एफ. ओ भुतेलो, मनुष्यबळ विभाग व्यवस्थापक प्रकाश नाईक, तसेच दोन्ही कामगार संघटनांचे अध्यक्ष गुणाजी परब, बाबलो सावंत तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविंद्र भवन साखंळी येथे संपन्न झालेल्या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आले आहे, व त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी सहमती पत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com