AAP and TMC Leaders entered in Congress Dainik Gomantak
गोवा निवडणूक

आप, टीएमसी नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपच्या बी टीमला बळी पडून मतांचे विभाजन न करण्याचे आवाहन

Vilas Mahadik

पणजी : काँग्रेसमध्ये सामील झालेल्या आप आणि टीएमसीच्या माजी नेत्यांनी गोव्यातील लोकांना भाजपच्या ’बी टीमना’ बळी पडून मतांचे विभाजन न करण्याचे आवाहन केले आहे. 'फक्त काँग्रेसच गोव्याचे रक्षण करू शकते आणि नागरिकांची काळजी घेऊ शकते,' असे काँग्रेस नेते विजय भिके यांनी स्पष्ट केलं. (AAP and TMC Leaders entered in Congress News Updates)

हळदोणा येथील आपचे माजी सरचिटणीस ब्रुनो फर्नांडिस आणि टीएमसीचे माजी सचिव सुकूर सेबी मिनेझिस यांनी हळदोणचे उमेदवार अॅड. कार्लुस आल्वारेस फेरेरा, पणजीचे उमेदवार ॲल्विस गोम्स, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, हळदोण गटाध्यक्ष आश्विन डिसुझा, निरिक्षक प्रकाश राठोड आणि आयव्हन डिसूझा यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ब्रुनो फर्नांडिस म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी स्वच्छ उमेदवारांना तिकीट देऊन बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आपमध्ये (Aam Aadmi Party) प्रवेश केला होता. मात्र आपने निवडलेल्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे,' असा आरोप त्यांनी केला.

'काँग्रेस हा एकमेव धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि त्याने नेहमीच जनतेच्या हितासाठी काम केले आहे. मी गोव्यातील जनतेला काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करतो. मतांच्या विभाजनाला वाव देऊ नका,' असे फर्नांडिस म्हणाले.

गोव्यासाठी काँग्रेसचे (Congress) योगदान कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे लोक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत. मी फक्त लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करेन. टीएमसी येथे मतांचे विभाजन करण्यासाठी आहे, म्हणून मी त्या पक्षाचा राजीनामा दिला.’’ असे सुकूर सेबी मिनेझिस यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान या नेत्यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्ष वाढण्यास आणि मजबूत होण्यास मदत होईल. काँग्रेस बदलला आहे. हा नवीन काँग्रेस पक्ष आहे.’’ असे अ‍ॅड. कार्लूस आल्वारेस फेरेरा यांनी म्हटलं आहे. भाजपने (BJP) नोकऱ्या विकून पात्र उमेदवारांना वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT