Goa Election: कुंकळ्ळी मतदारसंघात सर्वच पक्षांची चढाओढ

तृणमूल पक्ष रिंगणात उतरल्यामुळे व डॉ. जोर्सनसारख्या उच्च शिक्षित व समाजसेवी व्यक्तीला तृणमूलने उमेदवारी दिल्यामुळे रंगत वाढली आहे.
Clafasio Dias
Clafasio DiasDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी मतदारसंघाचा गड कोण जिंकणार? विद्यमान भाजपा आमदार क्लाफास डायस आपली जागा राखण्यात यशस्वी होणार का? काँग्रेसचे युरी आलेमाव आपल्या वडिलांचा किल्ला सर करणार की डॉ. जोर्सन फर्नांडिस इतिहासात घडविणार? यावरून पैजा लावल्या जात आहेत. या मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात असून, सामना अटीतटीचा होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Goa Election 2022)

Clafasio Dias
ज्या वेगाने पंतप्रधानांचं हेलिपॅड बनलं, त्याच वेगाने गोव्याचा विकास करु : केजरीवाल

भाजप, काँग्रेस (Congress) व तृणमूलने कुंकळ्ळी मतदारसंघ गांभीर्याने घेतला आहे. या पक्षाचे रती महारथी कुंकळ्ळीची जागा जिंकण्यासाठी प्रयत्नाची शिखस्त करीत आहेत. भाजपाच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः प्रत्यक्षात कष्ट घेत असून, मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) यांनी या मतदारसंघात तीन वेळा दौरा करून क्लाफाससाठी मते मागितली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, योगेश सागर, रवी व इतर नेते कुंकळ्ळीच्या विजयासाठी कष्टाची पाराकाष्टा करीत आहेत. क्लाफास डायस यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली आहे.

Clafasio Dias
भाजप आणि कॉंग्रेसचे स्थानिक नेते उत्पल पर्रीकरांच्या पाठिशी

चांदरा, गिरदोली, परोडा , बाळ्ळी, आंबावली या पंचायत क्षेत्रात बरीच मुसंडी मारली आहे. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात सोळा हजार मतदार असून, भाजपाचे एक गट्ठा मतदार भाजपाबरोबर राहिल्यास क्लाफास कुंकळ्ळीत कमळ फुलविण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाशी (BJP) बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले सुदेश भिसे व अपक्ष उमेदवार संतोष भिसे भाजपाची मते फोडण्यास यशस्वी ठरले तर क्लाफाससाठी ही लढाई कठीण होणार आहे.

युरी आलेमाव व तृणमूलचे डॉ. जोर्सन फर्नांडिस, आरजीचे व्हील्सन कार्डोजो, अपक्ष मिलाग्रीस दी चादोर व आपचे प्रशांत नाईक यांच्यात भाजपविरोधी व विशेष करून अल्पसंख्याक मते विभागली जातील.

Clafasio Dias
भाजपकडून पैसे घ्या, पण मत मात्र तृणमूल काँग्रेसलाच द्या: अभिषेक बॅनर्जी

डॉ. जोर्सन यांची आघाडी

तृणमूल पक्ष रिंगणात उतरल्यामुळे व डॉ. जोर्सनसारख्या उच्च शिक्षित व समाजसेवी व्यक्तीला तृणमूलने उमेदवारी दिल्यामुळे रंगत वाढली आहे. डॉ. जोर्सन यांनी प्रचारात अनपेक्षित आघाडी घेतली आहे.

युरी जिंकू शकतात, पण...

माजी आमदार ज्योकीम आलेमाव यांच्या पुण्याईवर त्याचे पुत्र युरी आलेमाव मते मागत आहेत. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात सहा हजार मते घेतल्यास युरी ही शर्यत जिंकू शकतात. मात्र, गणित तेवढे सोपे नाही. युरीसाठी काँग्रेसचे नेते दिगंबर कामत, राजेश पायलट, अलका लांबा यांनी प्रचार केला आहे. राहुल गांधीही युरीच्या प्रचारात उतरणार असल्यामुळे युरी समर्थकांना हुरूप आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com