Valvanti River Vitthalapur, Karapur Chikhal Kalo, Vitthalapur traditional festival Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Valvanti Chikhal Kalo: 'हरी रे माझ्या पांडुरंगा'! वाळवंटीकाठी रंगला चिखलकाला, बालगोपाळांत संचारला उत्साह Video

Chikhal Kalo Sanquelim Vithhalapur: वर्षातून दोनदा होणाऱ्या या गोपाळकाला अर्थात चिखलकाल्यात लहानांसह ज्येष्ठांचाही सहभाग असतो. एकादशीनंतर त्रयोदशीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा चिखलकाला होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: ‘हरी रे माझ्या पांडुरंगा’ चा गजर करीत व एकमेकांवर चिखल उडवत विठ्ठलापूर सखळीतील वाळवंटी किनारी प्रथेप्रमाणे होणारा चिखलकाला मोठ्या उत्साहात रंगला. आबालवृद्ध विठ्ठलभक्त या चिखलकाल्यात सहभाग घेत चिखलात रंगून गेले होते. यावेळी विविध पारंपरिक क्रीडाप्रकारही सादर करण्यात आले.

वाळवंटी नदीच्या किनारी भक्त पुंडलिक मंदिरासमोर परंपरेप्रमाणे चिखलकाला साजरा होतो. वर्षातून दोनदा होणाऱ्या या गोपाळकाला अर्थात चिखलकाल्यात लहानांसह ज्येष्ठांचाही सहभाग असतो. आषाढी व कार्तिकी एकादशीनंतर त्रयोदशीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा चिखलकाला होतो.

सकाळी विठ्ठल रखुमाईची पालखी मंदिरातून वाळवंटी काठी आल्यानंतर दुपारी बालगोपाल पुंडलिक मंदिराजवळ जमतात. मंदिरात पोह्यांचे लाडू बनविले जातात. मंदिरासमोर डबके तयार करून चिखल बनवला जातो.

नंतर वाळवंटी काठच्या देव साखळेश्वरजवळ पारंपारिक ढोलकी वाद्यासह आरत्या म्हटल्या जातात. हे क्रीडा प्रकार सुरू असतानाच मध्येच युवकांचे गट कोणा कोणाला चिखलाच्या डबक्यात घेऊन जात असतात. डबक्यात टाकून चिखलाने त्याचे अंग रंगविणे हे प्रकार सुरूच असतात.

चिखलकाल्यात रंगतात पारंपरिक खेळ

आरत्या संपल्यावर चिखलकाल्यात सहभागी विठ्ठल भक्तांमध्ये विविध पारंपरिक खेळ रंगतात. त्यात रिंगण घालणे, लांब उडी मारणे, कोलांटी मारणे, कापडाने मारणे असे खेळप्रकार झाल्यावर एका माणसावर देवीचा अवसर आणला जातो. अवसारी पुरूषाला लहान मुले आपण परीक्षेत उत्तीर्ण होणार ना ? असे प्रश्न विचारतात. तर काही मटकाप्रेमी मटक्याचा नंबर काय येणार ? असेही विचारतात. हा प्रकार अत्यंत मनोरंजनाचा असतो. यानंतर या भक्तांसाठी आणलेले खाण्याचे पदार्थ किंवा फळे उंच हवेत फेकली जातात. आणि ती झेल टिपण्यासाठी विठ्ठलभक्तांची बरीच चढाओढ लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

SCROLL FOR NEXT