Tulsi Vivah Goa Tradition  Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Tulsi Vivah: गोव्यातील 'व्हडली दिवाळी'; दिंडा, 'धेडा व धेडी... जाणून घ्या काय आहे प्रथा

Goa Tulsi Vivah Tradition: चातुर्मास संपल्यावर देवाचे अर्थात भगवान श्रीकृष्णाचे तुळशीमातेशी लग्न लागते

Akshata Chhatre

Goa Tulsi Vivah Customs Rituals Traditional Celebration

प्रा. विघ्नेश शिरगुरकार

गोव्यात दिवाळीच्या सणानिमित्त दणक्यात साजरा होणारा आणखीन एक उत्सव म्हणजे तुळशीविवाह. जवळपास संपूर्ण चातुर्मास जगत्पालक विष्णू हा झोपून असतो असे सश्रद्ध हिंदू मानतात. चातुर्मासाला आषाढी शुद्ध एकादशीला अर्थात देवशयनी एकादशीला आरंभ होऊन देव उठनी एकादशीच्या अर्थात कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू दिर्घ अशा निद्राकालातून उठतात. ज्या दिवशी भगवान विष्णू निद्राधीन होतात त्या दिवसाला वा तिथीला देवशयनी एकादशी असे म्हणतात तर ज्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देव उठनी एकादशी असे म्हणतात.

कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाहास आरंभ होतो तो सर्वसाधारणतः कार्तिक शुद्ध पोर्णिमेपर्यंत चालतो. चातुर्मास संपल्यावर देवाचे अर्थात भगवान श्रीकृष्णाचे तुळशीमातेशी लग्न लागते व या देवांच्या विवाह सोहळ्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना सुरूवात होते.

चातुर्मासात तुळशीला का पाणी वाहू नये?

तुळशी वृंदावनात संपूर्ण चातुर्मासात पाणी वाहू नये किंवा ओतू नये असे शास्त्रात सांगितले जाते. चातुर्मासात विष्णू तुळशीत झोपलेले असतात अशी श्रध्दा आहे म्हणून तुळशीला या दिवसांत पाणी न घालण्याचा नियम सांगितलेला आहे.

गोव्यात दिवाळी ही 'व्हडली दिवाळी' व 'धाकटी दिवाळी' अशी साजरी केली जाते. धाकट्या दिवाळीत वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, बलिप्रतिपदा असे सण साजरे केले जातात तर 'व्हडल्या दिवाळी'त एकमेव तुळशी विवाह साजरा केला जातो.

लग्न लागल्यावर वृंदावनाभोवती यजमान एक प्रदक्षिणा घालत मुठिमुठीने चुरमुरे किंवा पोहे उधळतो. अन् ते पडणारे चुरमुरे झेलायला धावणारी लहानांपासून मोठ्यांची धावपळ पाहून आपलंही मन तेवढंच लहान होतं. चुरमुरे उधळताना काही ठिकाणी 'फोव खायो' (पोहे खा) असं म्हणतात तर काही ठिकाणी 'गोविंदा' असंही म्हणतात पण दोन्ही ठिकाणी भावना तीच.

कार्तिक महिन्यात दशमी ते द्वादशीपर्यंत गोव्यातील सुवासिनी बायका उपवास करतात, केवळ रात्रीच्यावेळी अन्न ग्रहण करून हा उपवास केला जातो. तुळशीच्या लग्नादिवशी उपासाची सांगता होते आणि याचवेळी कापसाच्या वातींचे अनेक दिवे उजळवले जातात. लग्न लावण्यासाठी आलेले पुरोहित घरच्या माणसाच्या मनाजोगा संकल्प करतात आणि देवाची आराधना केली जाते.

तुलसी विवाहाची आख्यायिका काय सांगते? (Story of Tulsi Vivah)

भगवान विष्णू नेहमीच त्यांच्या बुद्धिचातुर्यासाठी ओळखले जातात. पौराणिक आधाराच्या अनुसार जालंधर नावाच्या राक्षसाने उत्पात माचवला होता आणि त्याची पत्नी म्हणजेच तुलसी हिच्या पातिव्रत्यामुळे त्याला हरवणं देवांसाठी कठीण झालं होतं. याच्यावर उपाय म्हणून देवराज इंद्र आणि इतर देवांनी वैकुंठात भगवान विष्णूंजवळ जाऊन जरासंधाचा वध करण्याची प्रार्थना केली.

जालंधर युद्धावर गेलेला असताना विष्णू जालंधराच्या रूपात तुलसी समोर आले आणि ती रूप बदलून आलेल्या विष्णूला ओळखू न शकल्याने तिचे पातिव्रत्य भंग झाले आणि परिणामी जालंधराचा वध झाला. मात्र तुळशीने भगवान विष्णूंच्या या कृत्याबद्दल त्यांना शाप दिला आणि भगवंताने देखील याचे प्रायश्चित म्हणून शाळीग्रामाच्या रूपात तुळशीला तिच्यासोबत विवाह करण्याचे वचन दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT