Vat Purnima Goa X
गोंयची संस्कृताय

Vat Purnima: फांदी छाटून पूजा करण्यापेक्षा, वडाचे रोप लावा आणि निसर्गाची भक्ती करा

Vat Purnima Importance: वटवृक्षाची सांगड पातिव्रत्याचीही घातली गेली आहे. सत्यवान-सावित्रीच्या गोष्टीत सावित्री सत्यवानाचा गेलेला प्राण पुन्हा परत घेऊन येते.

Sameer Panditrao

एक स्त्री म्हणून वडाच्या झाडाकडे जेव्हा मी पाहते तेव्हा लोकसाहित्यातून मला समजलेले लोकमानसही मी लक्षात घेत असते. आमचे लोक श्रद्धेने वृक्षांची पूजा करत आले आहेत. या वृक्षांचे जतन व्हावे या हेतूने त्यांनी एक धार्मिक कवच वृक्षांभोवती तयार केले होते.  

वटवृक्षाची सांगड पातिव्रत्याचीही घातली गेली आहे. सत्यवान-सावित्रीच्या गोष्टीत सावित्री सत्यवानाचा गेलेला प्राण पुन्हा परत घेऊन येते. वडाचे झाड हे मुबलक प्राणवायू देणारे झाड म्हणून ओळखले जाते. हा संदर्भही सावित्री-सत्यवानाच्या कथेसंबंधात जाणला गेला पाहिजे. आपल्या अनेक सणांमधून पत्नी पतीच्या उत्तम आरोग्याची कामना करताना दिसते. पतीच्या सौख्यातच कुटुंबाचे सौख्य, आनंद ती पाहते. आपल्या समाजाची मानसिकताच तशी आहे. 

आता आम्ही एका नवीन युगात वावरत आहोत. वटपौर्णिमेच्या श्रद्धेला एक नवीन रूप मिळताना आज आपण पाहतो आहोत. वडाची फांदी बाजारातून विकत आणून ती वटपौर्णिमेच्या निमित्ताने पुजली जाताना आपल्याला दिसते आहे. यातून कुठेतरी काहीतरी चुकल्याचेही जाणवते आहे. खरंतर धार्मिक ग्रंथात हे देखील लिहिले गेले आहे की जेव्हा वडाची फांदी छाटली जाते तेव्हा भगवान शंकरांचा हात कापल्याचे पातक आपल्याला मिळते. 

वडाची फांदी पूजेला लावून आताची पिढी वटपौर्णिमा प्रतीकात्मक पद्धतीने साजरी करण्याऐवजी वडाचे रोपटे (किंवा अन्य दुसरे झाड) जर आपण मातीत लावले तर त्यात अधिक सर्जकता असेल. ते खऱ्या अर्थाने निर्मितीचे प्रतीक असेल आणि निर्मिती ही नेहमीच आनंद देणारी असते. 

आमच्या जुन्या पिढीला अक्षर ओळख नव्हती पण झाड आम्हाला जगवते, निसर्ग आम्हाला जगवतो हे जाणण्याइतके ते सुसंस्कारित होते. निसर्गाचे संवर्धन व्हायला हवे म्हणून त्यानी निसर्गाला धार्मिक रूढींमध्ये अधिष्ठान दिले. मात्र आज आपण सुशिक्षित असून या धार्मिक रुढींचा अर्थ वेगळा घेत चाललो आहोत. 

वडाच्या झाडाकडे जाऊन त्या भोवती फेरे न घेता बाजारातून वडाची फांदी आणून तिची पूजा करणे यात वडाच्या झाडाला होणारी दुखापत आमच्या लक्षातही येत नाही. वडाच्या छाटलेल्या फांदीची पूजा हा पर्यावरण किंवा शिक्षण या संबंधित असलेला वर्तमान काळातील एक विसंगत विचार आहे. 

वडाचे झाड आपल्याला भरपूर प्राणवायू पुरवते हे जाणून या झाडांचे रक्षण करणे हे आज गरजेचे आहे.  वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली तरी चालेल. आणि धार्मिक भावनांचा जर प्रश्न असेल तर वडाच्या झाडाची फांदी न आणता जिथे वडाचे झाड आहे तिथे आवर्जून जा आणि तिथे वडाची पूजा करा.

- पौर्णिमा केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Goa Politics: ...अन्यथा 2027 च्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, गोमंतक गौड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Goa Dairy: गोवा डेअरीतील दूध आधारभूत रक्कम 30 जुलैपर्यंत; शिरोडकरांचे आश्वासन

Akash Deep: वडील-भाऊ कोरोनात गेले, बहिण कॅन्सरशी लढतेय; दुःखाचं ओझं बाजूला ठेवत एजबॅस्टनवर आकाश दीपचा 'दीप' तेवला

Goa Opinion: शेकडो कोटी खर्च केले, पण समस्या कायम! गोव्यात विकास होतोय की विकासाचा अतिरेक?

SCROLL FOR NEXT