
Akash Deep dedicates Edgbaston Test's 10-wicket haul to his sister battling with cancer:
बर्मिंगहॅम कसोटीत भारताने इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात आकाश दीप जसप्रीत बुमराहच्या जागी आला आणि सामना संपताच तो भारताच्या विजयाचा हिरो बनला. बर्मिंगहॅम कसोटीत आकाश दीपने इंग्लंडच्या फलंदाजांना पराभूत केले आणि दोन्ही डावात १० विकेट्स घेतल्या. पण इंग्लंडविरुद्ध सामना जिंकल्यानंतर आकाशदीपने त्याच्या कुटुंबाशी संबंधित एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे तो भावनिक झाला.
एजबॅस्टन (Edgbaston) कसोटी जिंकल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने आयसीसीशी बोलताना म्हटले की, 'मी कधीही कोणालाही सांगितले नाही की माझी मोठी बहीण गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे'.
आकाश दीप पुढे म्हणाला की, 'या विजयाने माझी बहीण सर्वात जास्त आनंदी असेल, गेल्या दोन महिन्यांपासून ती ज्या टप्प्यातून जात आहे, त्या टप्प्यासाठी, या दोन महिन्यांत तिला मिळालेला हा सर्वात मोठा आनंद आहे'. कोरोना काळात आकाश दीपने त्याचे वडील आणि मोठ्या भावाला गमावले आहे.
आकाश दीपने १० विकेट घेतल्या
इंग्लंडमध्ये १० विकेट घेणारा आकाश दीप दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम १९८६ मध्ये दिग्गज खेळाडू चेतन शर्माने केला होता. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात ८८ धावा देऊन चार विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात आकाश दीपने इंग्लिश फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला लावले आणि ९९ धावा देऊन सहा विकेट घेतल्या.
आकाश दीपने (Akash Deep) दुसऱ्या डावात इंग्लंडच्या पहिल्या पाच फलंदाजांपैकी चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आकाश दीपने ८८ धावांवर जेमी स्मिथला बाद करून भारताचा विजय निश्चित केला.
त्यानंतर आकाशने इंग्लंडचा शेवटचा विकेट ब्रायडन कार्सेला बाद करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताने बर्मिंगहॅममध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.