Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Pakistani Boat Spotted Raigad: रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोरलई येथील खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Suspicious Pakistani Boat Spotted Off Raigad Coast
Suspicious Pakistani Boat Spotted Off Raigad CoastDainik Gomantak
Published on
Updated on

Suspicious Pakistani Boat Spotted Off Raigad Coast

मुरूड: रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोरलई येथील खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही बोट पाकिस्तानातून आलेली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

बोटीतून काही लोक उतरल्याचा संशय

संशयास्पद बोट आढळून आल्यानंतर स्थानिक पोलीस, नौदल, कोस्ट गार्ड आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बोटीची कसून तपासणी करण्यात येत आहे.

पोलिसांना बोटीमधून काही व्यक्ती समुद्रात उतरल्याचा संशय असून, रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं. परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून झाडाझडती घेण्यात येत आहे. या ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, एसआरपी आणि एलआययूचे अधिकारी सहभागी झाले आहेत.

Suspicious Pakistani Boat Spotted Off Raigad Coast
Mumbai Goa Highway: कोसळणारा धबधबा, पुरातन मंदिर; मुंबई गोवा महामार्गाजवळ आहे 'हे' स्वप्नवत ठिकाण

सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

बोट आढळल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा अलर्ट मोडवर गेला आहे. मुरूड, कोरलई, काशीद, अलीबाग आणि परिसरात चौकशी सुरू आहे. बंदर भाग, समुद्रकिनारे आणि संभाव्य मार्गांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

Suspicious Pakistani Boat Spotted Off Raigad Coast
Goa Bars: पर्यटनवृद्धीसाठी गोव्यात शाळा, मंदिरांपासून 100 मीटरमध्ये 210 मद्यालयांना परवाने; सर्वाधिक बार्देश तालुक्‍यात

सध्या बोट कोणाची आहे, कुठून आली, बोट येथे आणण्याचा उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बोटीवरील नाव, नंबर किंवा कोणतेही दस्तऐवज सापडलेले नाहीत. त्यामुळे ती बोट खरचं पाकिस्तानातून आलीय का याचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com