cultural stories Goa Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

शिरगावची लईराई आणि म्हापशाची मिराबाई; धर्मांतरानंतरही टिकून असलेलं प्रेमळ नातं

milagres and lairai goa story: गोष्ट आहे दोन बहिणींची, ज्यांची श्रद्धा आणि उपासनेची पद्धत बदलली असली तरीही त्यांच्यातले पण त्याचं प्रेम आजही टिकून आहे

Akshata Chhatre

Sister Goddesses Goa: गोव्याच्या भूमीत जिथे डोंगर आणि समुद्र एकमेकांना मिठी मारतात तिथे एक अनोखी गोष्ट दडली आहे. ही गोष्ट आहे दोन बहिणींची, ज्यांची श्रद्धा आणि उपासनेची पद्धत बदलली असली तरीही त्याचं प्रेम आजही टिकून आहे. यांपैकी एक बहीण म्हणजे देवी लईराई आणि दुसरी बहीण म्हणजे म्हापशाची मिराबाई,तिला कॅथोलिक भाविक आवर लेडी ऑफ मिरेकल्स म्हणून ओळखतात.

या दोन बहिणींची गोष्ट ऐकायला मोठी सुंदर आहे. म्हणतात, ह्या सात बहिणी होत्या. त्यापैकी मिराबाईला पोर्तुगीजांनी कॅथोलिक धर्मात आणले.

पण तरीही, आपल्या इतर सहा बहिणींशी तिचं नातं कधी तुटलं नाही. विशेषतः लईराई देवी आणि मिराबाई या दोघी तर अगदी सख्ख्या मैत्रिणींसारख्या आहेत.

शिरगावची जत्रा आणि म्हापसाच्या आवर लेडी ऑफ मिरेकल्सचं फेस्त अगदी लागोपाठ असतं. जत्रेच्या दिवशी लईराई देवी मिराबाईसाठी एक तेलाचा माठ पाठवते तर मिराबाई आपल्या बहिणीसाठी टोपलीभर फुलं पाठवते.

आवर लेडी ऑफ मिरेकल्सच्या फेस्ताच्या दिवशी हिंदू आणि कॅथोलिक दोन्ही धर्माचे लोक देवीला मेणबत्त्या, तेल, पैसे अर्पण करतात. शिरगावच्या जत्रेतही कॅथोलिक बांधव मोठ्या संख्येने देवी लईराईच्या दर्शनासाठी येतात. असं म्हणतात पूर्वी मिराबाईचं मंदिर मये येथे होतं. पण पोर्तुगीजांनी उत्तरेकडील भाग जिंकल्यावर ते मंदिर नष्ट झालं.

त्यानंतर मिराबाईने आपल्या भक्तांसाठी आवर लेडी ऑफ मिरेकल्सचं रूप घेतलं होतं. ही कथा दोन धर्मांच्या लोकांच्या मनात एकमेकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि श्रद्धेची ओळख करवून देते. दोन्ही देवींच्या पूजनाची पद्धत जरी वेगळी असली, तरी या दोन बहिणींचे प्रेम आजही गोव्याच्या मातीत सुगंध बनून दरवळते आहे. ही केवळ एक धार्मिक कथा नाही, तर सलोख्याची एक सुंदर साक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT