Navratri colors list marathi Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Navratri 2025 Colors List: हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरा केला जातो

Akshata Chhatre

Navratri 9 Colors Significance: शारदीय नवरात्रीचा पवित्र उत्सव २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या काळात माता दुर्गांच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या पूजेमध्ये प्रत्येक दिवसाच्या रंगाचे विशेष महत्त्व आहे.

असे मानले जाते की, नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या प्रत्येक रूपाच्या आवडीनुसार त्या त्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्यास देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या नऊ तिथींनुसार रंगांमध्ये बदल होत असतो.

यावर्षीच्या शारदीय नवरात्री २०२५ साठी नऊ शुभ रंग खालीलप्रमाणे आहेत:

२२ सप्टेंबर २०२५ (प्रतिपदा, माता शैलपुत्री) - पांढरा

२३ सप्टेंबर २०२५ (द्वितीया, माता ब्रह्मचारिणी) - लाल

२४ सप्टेंबर २०२५ (तृतीया, माता चंद्रघंटा) - गडद निळा

२५ सप्टेंबर २०२५ (तृतीया) - पिवळा

२६ सप्टेंबर २०२५ (चतुर्थी, माता कुष्मांडा) - हिरवा

२७ सप्टेंबर २०२५ (पंचमी, माता स्कंदमाता) - राखाडी

२८ सप्टेंबर २०२५ (षष्ठी, माता कात्यायनी) - नारंगी

२९ सप्टेंबर २०२५ (सप्तमी, माता कालरात्री) - मोरपंखी हिरवा

३० सप्टेंबर २०२५ (अष्टमी, माता महागौरी) - गुलाबी

१ ऑक्टोबर २०२५ (नवमी, माता सिद्धिदात्री) - जांभळा

नवरात्री आणि दुर्गा पूजेच्या महत्त्वाच्या तिथी

२०२५ मध्ये, शारदीय नवरात्रीची सुरुवात २२ सप्टेंबर रोजी कलश स्थापनेने होईल. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दुर्गा पूजा, जी महा षष्ठीपासून सुरू होते. २०२५ मध्ये, षष्ठी २८ सप्टेंबर रोजी येत आहे, आणि याच दिवसापासून पाच दिवसांच्या दुर्गा पूजेला सुरुवात होईल. या काळात महा षष्ठी, महा सप्तमी, महा अष्टमी, महा नवमी आणि शेवटी विजयादशमी हे दिवस साजरे केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

Konkan Railway: तिकीटची माहिती, ट्रेन लोकेशन, सुविधा… कोकण रेल्वेनं लाँच केलं 'KR Mirror' अ‍ॅप, एका क्लिकवर मिळणार A टू Z माहिती

Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Maoist Sujata Surrender: कुख्यात माओवादी सुजाताचे 43 वर्षानंतर आत्मसमर्पण; सरकारने जाहीर केले होते एक कोटी रुपयांचे बक्षीस

Viral Video: 'क्रिकेटचा देव' थोडक्यात बचावला, जंगलात मदतीची वाट पाहत बसला; सचिनसोबत नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT