सेरेंडिपिटी कला महोत्सवातील नृत्य विभाग नाट्य विभागाप्रमाणेच 'न चुकता येणारा' या श्रेणीत जमा होतो. शास्त्रीय नृत्यांबरोबरच, उच्च दर्जाच्या आशयपूर्ण समकालीन नृत्यांचा आस्वाद या महोत्सवात रसिकांनी घेतलेला आहे. यंदाचा सेरेंडिपिटी कला महोत्सव देखील त्याला अपवाद ठरणार नाही याची निश्चिती या महोत्सवातील नृत्य सादरीकरणांची यादी वाचून येते.
समकालीन शरीर मुक्त असते की ते नियंत्रणाखाली असते? ते अस्सल असते की अनुकरणातून आलेले असते? हे नृत्य आजच्या ग्राहक व्यवस्थेत शरीराची भूमिका आणि संस्कृती संदर्भ यावर प्रश्न उपस्थित करते. ऐतिहासिक सत्ता व्यवस्थेने वर्चस्व गाजवण्याची साधने म्हणून श्रद्धा, देवता, विधी आणि मिथकांचा कसा वापर केला याचा ते शोध घेते.
कलाकार : पाक न्ड्जमेना | कालावधी : 40 मिनिटे
ढगांमधील आकार शोधण्याच्या साध्या मोहातून 'निंबस' तयार झाले आहे. ढग हे अपेक्षांचे आणि इच्छांचे रूपक आहे. ढगांचे आकार आशा आणि निराशेत बदलत जातात. शेवटी जे काही राहते त्यात सत्याचे आणि आनंदाचे अंतरंग असतात तर 'पल्लवी' या सादरीकरणातून शरीर आणि हालचाल यांचा आकर्षक मेळ गुंतागुंतीचा आशय सादर होतो.
कोरिओग्राफर आणि सादरकर्ता : सुरज सुब्रमण्यम
कालावधी : निंबस 22 मिनिटे, पल्लवी 22 मिनिटे
असाधारण ऊर्जा लाभलेला डिक्सन एमबी हा कॅमेरूनमधील नर्तक, त्याच्या वडिलोपार्जित प्रेरणेतून आपल्या एकल सादरीकरणाद्वारे अनेक जादुई वैशिष्ट्ये सादर करतो. एनोवेटचा अर्थ आहे- सत्य चिरकाल असते. आपल्या सादरीकरणातून डिक्सन हिप हॉप, समकालीन नृत्य आणि मूळ संगीत एकत्र विणतो. 'मी कोण?' हा सार्वत्रिक प्रश्न उपस्थित करताना तो आपल्या सादरीकरणाला गुढ शक्तीशी जोडतो.
कोरिओग्राफर आणि सादर कर्ता :
डिक्सन एमबी
कालावधी : 60 मिनिटे
क्षमता, लवचिकता आणि मानवी संबंध यांचा शोध 'सुपरहिरो' घेतो. गतिमान हालचाली आणि नाट्यमयता यातून एक अस्पष्ट जग निर्माण होते, जिथे परिचित आणि अतिवास्तव यातील सीमा विरघळतात. भावनाप्रधान रचना आणि शक्तिशाली प्रतिकात्मकता प्रेक्षकांना चिंतन करायला लावते. नायक होण्यासाठी एखाद्याला खलनायकदेखील बनणे स्वीकारावे लागते.
कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक:
राघव हंडा | कालावधी : 45 मिनिटे
वर्षभरातील ऋतूंच्या आगमनाचे हे एक भव्य दृश्य चित्रण आहे. कालिदासाचे ऋतू संहार, माघचे शिशुपाल वध आणि शूद्रकाचे पद्मप्राभिटक यामधील स्वागतांचा वापर यात करण्यात आला आहे. समकालीन प्रेक्षकांना समजावे म्हणून त्यात हिंदी भाषांतराचे काही भाग आहेत.
दिग्दर्शन: प्रियाल भट्टाचार्य
कालावधी : 90 मिनिटे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.