Voile Mudai Goa Ganesh Chaturthi Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Voile Mudai: 'बाप्पा'ची पूजा दरवर्षी वेगळ्या घरात! चवथीची अनोखी परंपरा जपतेय ‘वोयले मुडाय’ गाव

Voile Mudai Ganesh Chaturthi: पंचवाडीच्या वोयले मुडाय गावात गणेशोत्सव साजरा करण्याची एक वेगळी आणि शतकानुशतकांपासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. गांवकार कुटुंब या परंपरेचे जतन करते.

Sameer Panditrao

शिरोडा: पंचवाडीच्या वोयले मुडाय गावात गणेशोत्सव साजरा करण्याची एक वेगळी आणि शतकानुशतकांपासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. गांवकार कुटुंब या परंपरेचे जतन करत असून, प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाची पूजा वेगवेगळ्या घरात होते. त्यामुळे सणाला आपुलकीची आणि जिव्हाळ्याची एक वेगळीच छटा लाभते.

आजकाल बहुतेक विभक्त कुटुंबे आपल्या घरातच गणेशोत्सव साजरा करताना दिसतात किंवा मग एकत्र येऊन सामूहिक पूजा करतात. परंतु वोयले मुडाय येथील ही परंपरा वेगळी ठरते. कुटुंब पाच भागांत विभागलेले असून, त्यातील काही भाग पुन्हा दोन किंवा चार उपभागांत विभागले गेले आहेत.

त्यामुळे गणपती पूजेची संधी विभागणीनुसार मिळते. चार उपभागांत विभागलेल्या कुटुंबांना दर २० वर्षांनी, दोन उपभागांत विभागलेल्या कुटुंबांना दर १० वर्षांनी आणि न विभागलेल्या कुटुंबांना दर ५ वर्षांनी पूजा करण्याची संधी मिळते.

‘वर्षकार’ला वर्षभर देवकार्याचा मान

ज्या घराला गणपती पूजेचा मान मिळतो त्यांना ‘वर्षकार’ म्हटले जाते. वर्षकाराकडे केवळ पूजेची जबाबदारीच नसून वर्षभर गावाच्या धार्मिक कर्तव्ये पार पाडावी लागतात. या परंपरेनुसार पहिली आरती झाल्याशिवाय इतर ठिकाणी आरतीस सुरुवात केली जात नाही, ही देखील खासियत आहे.

गणेश विसर्जनावेळी सगळे कुटुंबीय एकत्र येऊन सांगणे करतात आणि नैवेद्य अर्पण करतात. शहरांमध्ये स्थायिक झालेले सदस्यही या सणानिमित्त गावाकडे परत येतात. त्यामुळे भक्तीबरोबरच एकोपा व बंधुत्व अधिक दृढ होते.

हरमल गणेशोत्सवात घुमट आरती, भजन

येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ३२ व्या उत्सवानिमित घुमट आरती सादर होणार आहे. यात निमंत्रित गट सहभागी होणार असून या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते रोहन प्रकाश रामजी आहेत. तसेच संध्या ३ वाजता नाना पार्सेकर व साथी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी रसिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे केले आहे.

तिस्क उसगाव येथे आज फुगडी स्पर्धा

तिस्क, उसगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवार २ रोजी निमंत्रित पथकांसाठी फुगडी स्पर्धा आयोजित केली आहे. सायं. ४ वा. स्पर्धेला सुरुवात होईल.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रु. ७०००, द्वितीय रु. ५०००, तृतीय रु. ३००० व रु. १५०० ची प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पथकाला प्रवास खर्च म्हणून रु. १००० देण्यात येतील. अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT