Damodar Temple Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Damodar Temple: श्री दामोदर मुरगावला कसे आले? सप्ताह कसा सुरु झाला? 126 वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडणार ‘मुरगावचा दामबाब’ मधून

Damodar Temple History: मुरगावचे (वास्को) ग्रामदैवत श्री दामोदराचे देवस्थान. श्रावण- शुक्लपंचमी, 1899 यावर्षी या देवस्थानाची स्थापना मुरगांवमध्ये झाली.

Sameer Panditrao

गोमंतकियांच्या अनेक श्रद्धास्थानांपैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे मुरगावचे (वास्को) ग्रामदैवत श्री दामोदराचे देवस्थान. श्रावण- शुक्लपंचमी, 1899 यावर्षी या देवस्थानाची स्थापना मुरगांवमध्ये झाली. यंदा या देवस्थानाला 126 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुरगाव हे बंदराचे तसेच श्रमशक्तीवर जगणाऱ्यांचे शहर. बंदरामुळे या शहराची भरभराट झाली. या शहराचे अभिमानास्पद असे सांस्कृतिक आणि धार्मिक भूषण म्हणजे श्री दामोदर देवस्थान  असे या शहरातले लोक मानतात.

श्रावण शुक्ल षष्ठी, नागपंचमीच्या दुसऱ्या दिनी साजरा होणारा दामोदराचा दीड दिवसीय अखंड भजनी सप्ताह ही भाविकांसाठी आनंदाची पर्वणी असते. यंदा 126 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून, सप्ताहाच्या पूर्वसंध्येला, ललिता जोशी यांनी लिहीलेल्या ‘मुरगावचा दामबाब’ या पुस्तिकेचे लोकार्पण प्रमुख पाहुणे श्रीनिवास धेंपे यांच्या हस्ते विशेष समारंभात करण्यात आले. 

या पुस्तिकेला प्राचार्य माधवराव कामत यांची आशीर्वादपर प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेत प्राध्यापक कामत म्हणतात, ‘श्री दामोदर मुरगावला केव्हा आणि कसा आला, त्याला कोणी व का स्थापन केले, देवस्थानचा स्थापना दिन म्हणून प्रतिवर्षी सप्ताह कसा साजरा केला जातो व त्याची कलेकलेने कशी वृद्धी होत गेली, मुरगावच्या दामोदरचा  तो छोटासा उत्सव कालांतराने महोत्सव कसा झाला याचे साद्यंत  मोहक व रोचक वर्णन लेखिकेने या पुस्तिकेत केले आहे.’

देवस्थानाच्या इतिहासाचे कथन करताना या शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा चित्ताकर्षक असा परिचय हे पुस्तक करून देते. देवस्थानाच्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी ललिता जोशी यांनी खूप परिश्रम घेतल्याचे जाणवते. श्रीनिवास धेंपे या पुस्तिकेबद्दल बोलताना म्हणाले, ‘मुरगांव शहराचा 126 वर्षांपूर्वीचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास उलगडून दाखवणारा हा दस्तावेज असून येणाऱ्या पिढ्यांपर्यंत तो पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या पुस्तिकेद्वारे होईल.’ 

श्री विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी या पुस्तिकेचे संपादन व प्रकाशन केले आहे. या पुस्तिकेचा इंग्रजी अनुवाद चारुता जोशी मेहता यांनी केला आहे. ‘दामोदर देवस्थानाच्या इतिहासाविषयी घरातील जाणकारांकडून तसेच इतरांकडून ऐकलेल्या घटनांचा संदर्भ घेऊन, त्यातील नेमके सत्य शोधून ही पुस्तिका लिहिण्याचा संकल्प मी केला आहे. ही पुस्तिका संग्राह्य व माहितीपूर्ण व्हावी यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहे’ असे ललिता जोशी याप्रसंगी आपल्या मनोगतात म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem lottery: केपेची लॉटरी ठरली 'हिट'! गणेशोत्सव मंडळाच्या कूपनसाठी मध्यरात्रीपासून गर्दी; 2 कि.मीची रांग

Canacona: चार रस्ता-आगोंद रस्ता देतोय अपघातांना आमंत्रण; वाहनचालक त्रस्त, ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी

Valpoi: वाळपईतील रुग्णांसाठी 'फिजिओथेरपी' वरदान, वर्षभरात शेकडो रुग्‍णांना लाभ; 3200 उपचार सत्रांचे आयोजन

भारताच्या बाजारपेठेत महागड्या अमेरिकी वस्तूंना गिऱ्हाईक नाही, रशिया-चीनचा माल ठरतोय हिट

Goa News Live Update: कृषी मंत्री रवी नाईक यांनी कुत्र्याच्या चाव्याने पीडित महिलेची घेतली भेट

SCROLL FOR NEXT