नवा कोकणी चित्रपट 'मोग आसू'च्या संगीत अल्बमचे अनावरण पणजी येथील मॅकानिझ पॅलेस चित्रपटगृहात गोव्याचे प्रसिद्ध संगीतकार मुकेश घाटवळ यांच्या हस्ते अलीकडेच समारंभपूर्वक करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक एंजेलो ब्रागांझा आणि आर. एस. पीपलवा हे यावेळी उपस्थित होते.
मायरॉन एस्टिबॅरो यांनी संगीतबद्ध केलेले या अल्बममधील गाणी प्रतिभावान गायक हर्शेल मास्कारेन्हास, वेनिझिया डायस, शैलेशा फर्नांडिस, वेर्फिना डायस आणि ओर्विल रॉड्रिग्ज यांनी गायली आहेत. या साऱ्या गायक मंडळीच्या उपस्थितीने समारंभातील वातावरण अधिक आकर्षक बनले होते. मॅकानिझ पॅलेसमधील या सोहळ्यात ओर्विल रॉड्रिग्ज आणि हर्शेल मास्कारेन्हास यांनी अल्बममधील काही गाणी सादर केली.
'मोग आसू' हा चित्रपट आर. एस. क्रिएशन्स आणि फ्लोईंग मांडवी फिल्म्स यांनी संयुक्तपणे बनवला आहे. 'नाचोया कुंपासार' या गाजलेल्या कोकणी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून निर्माण झालेली ही नवीन चित्रपट निर्मिती प्रेम, विरह या भावनांतून निर्माण झालेली अर्ध-काल्पनिक कथा मनोरंजक पद्धतीने प्रस्तुत करते. या चित्रपटाचे निर्माते म्हणतात, चित्रपटाच्या कथानकाला भावनिक उंचीवर नेण्यात या चित्रपटाचे संगीत महत्त्वाची भूमिका बजावते. 'मोग आसू' हा म्युझिक अल्बम गोव्याच्या (Goa) संगीत क्षेत्रातील समृद्ध प्रतिभेचा उत्कृष्ट दाखला आहे.'
हा अल्बम सर्व प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मवर जागतिक स्तरावर उपलब्ध करण्यात आला आहे. 'हे सुंदर संगीत जगभरातील श्रोत्यांसोबत शेअर करण्यासाठी आमच्या चित्रपटाची टीम उत्सुक आहे' असे या चित्रपटाचे (Moive) निर्माते याप्रसंगी म्हणाले. या अल्बमचे अनावरण करताना मुकेश घाटवळ यांनी त्यातील गाण्याचे तसेच त्याचे संगीतकार मायरॉन एस्टिबॅरो यांचे कौतुक केले. 'या अल्बम मधील प्रत्येक गाणे उत्कृष्ट आहे. गोमंतकीय संगीतकार उल्लेखनीय संगीताची निर्मिती करत आहेत आणि मोग आसूचे संगीत त्यातील सर्वोत्तम आहे.' असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.