Marcel folk art Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Marcel: बालचमूंचा आनंदोत्सव! गोव्याची समृद्ध लोकनृत्याची परंपरा; माशेलमध्ये रंगल्या स्पर्धा

Marcel Folk Dance: गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीज आणि इस्रायली लोकांनी लोकनृत्य आणि संगीतावर प्रभाव पाडला, असे म्हटले जाते. परंतु आजही गोव्यातील ग्रामीण भागात लोककलांचे जतन केले जात आहे.

Sameer Panditrao

संजय घुग्रेटकर

गोवा, गोमंतक म्हणजे लोककला, लोकनृत्याच्या नानाविध प्रकारांचा प्रचंड खजिना असलेला प्रदेश. गोमंतक या देवभूमीत गावोगावी लोककलांचा जागर कायम होत असतो. लोकनृत्य आणि संगीत ही गोमंतकीयांची जीवनरेखा असून ती गोमंतकीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कोणताही प्रसंग असो किंवा उत्सव असो, गोव्यात आनंदोत्सव हा आत्म्याला सुखावणारे संगीत आणि लोकनृत्याशिवाय अपूर्ण आहे.

त्यामुळेच प्राथमिक शाळेतील मुलेही येथील लोककलेत पारंगत असतात. माशेलच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे आयोजित लोकनृत्य स्पर्धेत तब्बल अठरा प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदवला आणि या कलाकारांसोबत पालक, ग्रामस्थांनी नोनू व्हिलेजचे संगीत सभागृह संपूर्ण भरले. काही ठिकाणी कार्यक्रमांना प्रेक्षकच नसतात, पण या ठिकाणी सभागृह अपुरे पडले, इतकी गर्दी पालक, ग्रामस्थांनी केली होती.

सांस्कृतिक संगीताच्या आनंददायी तालावर छोटी मुले मनसोक्त नाचली, लोकनृत्य सादर केले. त्यामुळे किमान तीन तास प्रेक्षकगृहांतील गर्दी कायम होती. गोवा म्हणजे निसर्गरम्य समुद्रकिनारे, चर्च, मंदिरे पाहणे अशी ओळख जगाला आहे, पण याच गोव्यात सांस्कृतिक वारशांचे, लोककलांचे जतन करण्यात छोटी मुलेही अग्रेसर आहेत, हे या लोकनृत्य सादरीकरणातून स्पष्ट जाणवत होते. हीच मुले गोव्याची सांस्कृतिक, लोकमानसातील सांस्कृतिक ओळख, परंपरा, संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी झटत आहेत, याची साक्ष या मुलांच्या प्रत्येक लोकनृत्यातून स्पष्‍ट होते.

गोव्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे जो पूर्व आणि पश्चिम संस्कृतींचा एक सुंदर संगम आहे. गोव्याचे लोकनृत्य आणि संगीत गोव्याचे सांस्कृतिक पर्यटन सर्वात मनोरंजक बनवते. गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीज आणि इस्रायली लोकांनी गोव्याच्या लोकनृत्य आणि संगीतावर प्रभाव पाडला, असे म्हटले जाते. परंतु आजही गोव्यातील ग्रामीण भागात लोककलांचे जतन केले जात आहे. येथील परंपरा, रितीरिवाज आणि संस्कृतीत खोलवर रुजलेले गोव्याचे पारंपरिक लोकनृत्य गोव्याचा दीर्घ इतिहास, समाजाचा स्तर आणि गोमंतकीय जीवनाची झलक दाखवते.

विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण

गोव्यातील काही सर्वात लोकप्रिय पारंपरिक लोकनृत्य म्हणजे घोडे मोडणी, धनगर नृत्य, तालगडी, शिगमो आणि मुसळ खेळ आहे. त्याचबरोबर धालो, फुगडी, गोफ, देखणी आणि जागर साजरा केला जातो. यापैकी बहुतेक नृत्य प्रकार शालेय मुलांनी माशेलात सादर केले. शालेय विद्यार्थ्यांनी खास करून कळशीनृत्य, करवंटी नृत्य, शेतकरी नृत्य, कुणबी नृत्य, धनगर नृत्य, देखणी, जोगवा, कोळीनृत्य, कट्टी डान्स खूपच बहारदारपणे सादर केला.

शाळेच्या शिक्षिकांनी आपापल्या नृत्यसमूहाला नृत्यातील बारकावे शिकवले होते, त्यामुळे कुठेही न अडखळता, प्रत्येक पायरीवर छोट्या मुलांनी नृत्य सादर केले. जवळ १८ शाळांनी या नृत्य स्पर्धेत भाग घेतला. एकूणच माशेलात बालकलाकरांकडून लोकनृत्याचा जागर रंगला आणि त्यात पालक, ग्रामस्थही दंग झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT