Goan customs and rituals Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Mangalagaur 2025: केळीचे मखर, सोळा दिवे अन् अलंकार; वाचा गोव्यात कशी साजरी होते 'अनोखी मंगळागौर'

Mangalagaur celebration Goa: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात

Akshata Chhatre

Goan Mangalagaur Rituals: हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे, आणि याच पवित्र महिन्यात विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे मंगळागौरी व्रत येते. हे व्रत माता पार्वतीला समर्पित असून, भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने केलेल्या कठोर तपस्येचे प्रतीक मानले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात.

मंगळागौरी व्रत २०२५: प्रमुख तिथी आणि महत्त्व

यंदा श्रावण महिन्यात मंगळागौरी व्रताचे चार मंगळवार असतील. त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

  • पहिली मंगळागौर: २९ जुलै २०२५

  • दुसरी मंगळागौर: ५ ऑगस्ट २०२५

  • तिसरी मंगळागौर: १२ ऑगस्ट २०२५

  • चौथी मंगळागौर: १९ ऑगस्ट २०२५

हे व्रत विवाहित महिलांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. नवविवाहित जोडप्यांसाठी तर या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि ते अधिक सुखी होते, अशी श्रद्धा आहे.

व्रताची तयारी आणि पूजा विधी

मंगळागौरी व्रताची तयारी करताना सर्वप्रथम घराची आणि पूजा स्थळाची स्वच्छता करावी लागते. पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य, जसे की अक्षता, विविध प्रकारची फुले, फळे, आणि नैवेद्य यांचे नियोजन केले जाते. त्यानंतर मंगळागौरीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना केली जाते. व्रत करणाऱ्या महिलेने या दिवशी उपवास पाळणे अपेक्षित असते.

पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी विधी उरकून घ्यावेत. त्यानंतर मंगळागौरीची षोडशोपचारे पूजा करावी. देवीला नैवेद्य दाखवावा, मंत्रांचे पठण करावे आणि आरती करावी. या पूजेमध्ये मंगळागौरी व्रत कथा वाचण्याचेही विशेष महत्त्व आहे. पूजा संपन्न झाल्यावर उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप केले जाते.

गोव्याची विशेष परंपरा: षोडशोपचारे पूजन

गोवा राज्यातही मंगळागौरीचे व्रत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते. इथे शिव आणि गणपती यांच्यासह गौरीची पूजा केली जाते. पूजेसाठी चौरंग मांडून त्याला केळीचे खुंट बांधून सुंदर मखर तयार केले जाते, जे फुलांनी सजवले जाते आणि भोवती रांगोळी काढली जाते.

या पूजेतील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे १६ संख्येचे महत्त्व. सोळा प्रकारची पत्री, सोळा प्रकारची फुले आणि पुरणाचे सोळा दिवे यांचा वापर करून षोडशोपचारे गौरीची पूजा केली जाते. गौरीसाठी पुरणाचे दागिने, हार, गजराआणि फणी असे विविध अलंकार बनवून ते देवीला अर्पण केले जातात. अंगपूजा, पत्रीपूजा आणि पुष्पपूजा यांसारख्या अंगभूत पूजाही यात समाविष्ट असतात.

व्रत करणाऱ्या बायका न्हाऊन-माखून पूजेला बसतात आणि पुरोहितांना बोलावून यथासांग पूजा केली जाते. मंगलारती झाल्यावर कहाणीवाचन केले जाते. त्यानंतर. फराळ दिला जातो आणि सुवासिनींना हळद-कुंकू, काजळ, करंडा, फणी, तांदूळ, खण, नारळ, सुपारी व दक्षिणा यांनी युक्त असलेले ताट दिले जाते. मंगळागौरी व्रत हे केवळ एक धार्मिक विधी नसून, ते श्रद्धा, समर्पण आणि कौटुंबिक सौहार्दाचे प्रतीक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharbandora: 'हे आदिवासी संस्कृतीचा कणा असलेले जंगल, इथे IIT नको'! धारबांदोडा ग्रामस्थ ठाम; भूसंपादनास तीव्र आक्षेप

School Paperless Exams: पेपर विरहित परीक्षा घेणारे 'गोवा' ठरेल पहिले राज्य! हेगडेवार विद्यालयात यशस्वी प्रयोग

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT