Traditional Fishing in Goa: गोव्यातील पारंपारीक मासेमारी, समुद्राशी नाळ जोडणारा वारसा

Fishing in Goa: गोवा हे निसर्गसंपन्न किनारपट्टीचे राज्य असून, येथील मासेमारी (Fisheries) ही केवळ पारंपरिक व्यवसाय नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे.
Traditional Fishing in Goa
Traditional Fishing in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे निसर्गसंपन्न किनारपट्टीचे राज्य असून, येथील मासेमारी (Fisheries) ही केवळ पारंपरिक व्यवसाय नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. सुमारे १०५ किमी लांबीच्या किनारपट्टीवर हजारो कोळी समुदायातील लोक आपली उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे.

गोव्यातील मासेमारी ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. येथील कोळी समाज पारंपरिक पद्धतींनी मासेमारी करत होता, जसे की हाताने जाळे टाकणे, बोटींमधून मासे पकडणे आणि समुद्रकिनाऱ्यावर मासे सुकवणे. आधुनिक काळात, तंत्रज्ञानाच्या मदतीने या व्यवसायात बरीच प्रगती झाली आहे.

गोव्यातील मासेमारी ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध परंपरा आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आणि बदलत्या पर्यावरणीय परिस्थितींमुळे हा व्यवसाय आव्हानांसमोर उभा आहे.

Traditional Fishing in Goa
Shriya Pilgaonkar In Goa: सचिनची लाडकी लेक गोव्यात करतेय मजा, पाहा PHOTOS

मासेमारीच्या पद्धती

लहान नौका आणि हाताने टाकलेल्या जाळ्यांचा वापर करून पारंपरिक मासेमारी केली जाते. तर मोठ्या ट्रॉलर्सच्या साहाय्याने खोल समुद्रात मासेमारी केली जाते.

नद्यांमध्ये आणि खाड्यांमध्ये केली मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते.गोव्यात अनेक ठिकाणी मत्स्यशेती केली जाते. बंदिस्त तळ्यांमध्ये मत्स्यपालन करून ही मासेमारी केली जाते.

गोव्यात मिळणारे मासे

१) मोठे मासे - हे बहुधा तळण्यासाठी किंवा मसाला भरून तळण्यासाठी घेतात. जसे बांगडे, पापलेट, कर्ली, विसवण, तारले.
२) लहान मासळी - हुमण (आमटी) किंवा धबधबीत (तोंडी लावणे) करण्यासाठी घेतात. जितकी मासळी जास्त काटेरी तितकी ती जास्त चविष्ट. त्यामुळे खाताना खूप काळजी घ्यावी लागते. चुकून काटा टोचलाच तर भाताची उंडी करून गिळायला सांगतात. खूप काटे असलेल्या लहान मासळींमध्ये वेर्ली, मोतिसाळी (खापी), सौंदाळी किंवा बुरांटे या मासळ्या येतात. त्या तळून काट्यासह खाता येतात.

खवले नसलेला व विशेष काटे नसलेला मासा म्हणजे Kingfish ज्याला विसवण किंवा सुरमई म्हणतात. त्यापाठोपाठ रावस, चणाक, बांगडा, पापलेट, तांबोशी, मुडशी, मोरी, शेवटे हे चवदार मासे येतात. बांगडे, तारले, पेडवे या माशांत Omega-3-fatty acids सर्वांत जास्त असतात.

कर्ली ही मोठ्या माशांत समाविष्ट होते. जेवढी मोठी कर्ली तेवढी जास्त स्वादिष्ट. शिवाय काटे व्यवस्थित काढून खाण्यास सोपी.

Traditional Fishing in Goa
Goa Opinion: तरच 'माणूस' वाचू शकेल! उष्णतेची लाट, पूरस्थिती, चक्रीवादळाच्या समस्या; मानवी अस्तित्वाच्या लढाईचे भयंकर पर्व

कवच असलेल्या मासळ्या - यातही दोन प्रकार आहेत. १) पातळ कवच असलेल्या, २) जाड कवच असलेल्या.
१) कोलमी यांचे कवच पातळ असते. याचे ही दोन प्रकार मिळतात. अ) मोठ्या आकाराच्या वाघी Tiger Prawns - तळण्यासाठी घेतात. ब) लहान आकाराच्या गालमो या हुमणांत किंवा पुलावांत घालतात.


जाड कवचाच्या मासळ्या १) तिसऱ्या (Yellow clam) शिंपल्या उघडून ज्यांत मांस चिकटले आहे तो भाग ठेवून दुसरा टाकून द्यायचा. २) खुबे Black clam, ३) शिनाणी (Green Mussels), ४) कालवा Oysters, ५) कुर्ल्या (crabs) किंवा खेकडे किंवा चिंबोऱ्या त्यांतील पिवळा पदार्थ (Fat) काढून टाकायचा. तांबडा पदार्थ ज्याला लाख म्हणतात. ती अंडी असतात, ती खातात.

'कुर्ल्या' खाणं जिकिरीचं काम असतं. दाढेने वरचे आवरण फोडल्याशिवाय आतील गर चोखता येत नाही. हिरव्या शिंपल्यातील शिनाण्यांची भजी, तळलेली मसालेदार कालव, खुब्यांचे हुमण, मोठ्या कोलमीचा बालशांव हे खास पदार्थ गोव्यातच मिळातात.

गोव्यातील मासेमारीमध्ये पेडवे, रावस, सुरमई, बांगडा, झिंगे हे मासे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com