Mangeshi Temple Ponda Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Makharotsav festival in Goa: फोंड्यात एक असेही मंदिर आहे जे देवीचे नसून, शिवाची आराधना करणारे आहे, तरीही येथे नऊ ते दहा दिवस मखरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो

Akshata Chhatre

Makharotsav Navratri in Goa: घटस्थापनेने देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, गोव्यातही या उत्सवाची वेगळीच धूम पाहायला मिळत आहे. गरबा-दांडियाचा प्रभाव वाढत असला तरी, गोव्याच्या नवरात्रीची खरी ओळख येथील मंदिरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या मखरोत्सवामुळे आहे. हा मखरोत्सव विशेषतः फोंडा महालातील मंदिरांचे खास आकर्षण ठरला आहे. आश्चर्य म्हणजे, फोंड्यात एक असेही मंदिर आहे जे देवीचे नसून, शिवाची आराधना करणारे आहे, तरीही येथे नऊ ते दहा दिवस मखरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

मखर म्हणजे काय?

मंदिराच्या छताला लोखंडी साखळ्यांनी टांगलेली एक सुंदर लाकडी चौकट म्हणजे मखर. ही चौकट रंगीत कागद, फुले आणि दिव्यांनी सजवली जाते. या मखरात देवी-देवतांची मूर्ती ठेवून चौघडा, ढोल, ताशांच्या गजरात वेगवेगळ्या तालावर हे मखर हलवले जाते आणि पुजाऱ्यांकडून आरत्या केल्या जातात. नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये हा उत्सव साजरा होतो आणि यात कीर्तन, संगीत, नृत्य तसेच पारंपरिक आरत्यांचे आयोजन केले जाते.

ही परंपरा सोळाव्या शतकात हिंदू मंदिरे नष्ट झाल्यानंतर व मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या गरजेतून निर्माण झाली होती. या मूर्तींना सुरक्षितपणे नेण्यासाठी आणि त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी झुलत्या चौकटींचा वापर करण्यात आला. त्यातून ही परंपरा सुरू झाली, असे सांगण्यात येते.

मखर म्हणजे केवळ मूर्ती ठेवण्याचे साधन नसून ते भक्तांच्या श्रद्धेचे आणि देवी देवतांच्या भक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच हा मखर सोहळा पाहण्यास प्रत्येक देवस्थानचे स्थानिक महाजनांची उपस्थिती असतेच. पण इतर राज्यात व परदेशात राहणारे महाजन व भक्तगण व पर्यटकही खास येतात.

मंगेशाचा अनोखा मखरोत्सव

फोंड्यामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे श्रीमंगेशी येथील श्री मंगेशाचे (शंकराचे) मंदिर. या मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मखरोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. या दिवसांत श्री मंगेशीला प्रत्येक दिवसाच्या खास रंगानुसार सजवून मखरात बसवले जाते. येथील मखर वेगवेगळ्या तालांनुसार वेगवेगळ्या दिशांमध्ये फिरते, ही या मंदिराची खासियत आहे.

या मंदिराचे पुजारी अनिश भावे यांनी या परंपरेबद्दल माहिती दिली. ते सांगतात की, मखरोत्सवाच्या वेळी येथे चार प्रकारचे ताल वाजवले जातात: धृपद, झपताल, धीपचिंदी आणि दादरा. तालातील बदलांनुसार मखर हलवण्याची पद्धतही बदलते. १४ मात्रांचा ताल वाजतो तेव्हा मखर अगदी हळू हलवले जाते, झपतालासह त्याचा वेग वाढतो आणि धीपचिंदीच्या तालावर ते वेगाने फिरते. इतर मंदिरांप्रमाणे हे मखर गोलाकारात फिरत नाही.

याशिवाय, दर दिवशी मंगेशाचे रूप बदलते आणि देव वेगळ्या वाहनावर आरूढ होतो. शेवटच्या दिवशी 'जांटो मंगेश' म्हणजेच म्हातारपणातील जटाधारी देवाचे रूप पाहायला मिळते. या वर्षी नवरात्रीचे दहा दिवस असल्याने, देव एका वेगळ्याच वाहनात विराजमान होईल, ज्याला गंडभेरुंड किंवा गंडभैरव म्हणतात.

गोव्यातील प्रसिद्ध मखरोत्सव

गोव्यातील अनेक मंदिरांमधील मखरोत्सव प्रसिद्ध आहेत. यात फोंडा महालातील श्री महालक्ष्मी (बंदिवडे), श्री शांतेरी, श्री कामाक्षी, श्री रामनाथ (रामनाथी), श्री शांतादुर्गा (कवळे), श्री नागेश महारुद्र (नागेशी), श्री महालसा नारायणी (म्हार्दोळ) आणि इतर अनेक मंदिरांचा समावेश आहे. फातर्पा येथील श्री शांतादुर्गा आणि वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवस्थानातील मखरोत्सवालाही भाविकांची मोठी गर्दी असते.

नवरात्रोत्सवाच्या काळात गोव्यातील विविध मंदिरांत पारंपरिक धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे या उत्सवाला एक आगळाच रंग चढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू, सहा दिवसांसाठी मुख्यमंत्री ते गोव्याच्या राजकारणाचे 'कर्णधार'; 'रवी नाईक' यांची अनोखी कहाणी!

Viral Video: डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा...! राखी सावंतचा ट्रम्प कनेक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ, नेटकरी म्हणाले, "अमेरिकेची पुढची प्रेसिडेंट राखी ट्रम्प"

अरे हिरो...! रोहित शर्मा नवीन कर्णधार शुभमन गिलला पहिल्या भेटीत काय म्हणाला? विराट कोहलीला गाडीत बसलेलं पाहिलं अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT