Cacora Goa Hanuman Temple Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

164 वर्षांपूर्वीचे घनदाट जंगल, काकोड्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान; श्री संस्थान मारुतीगडावरील हनुमान मंदिर

Cacora Goa Hanuman Temple: महात्मा गांधींच्या महानिर्वाणाच्या अकराव्या दिवशी १० फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांनी सर्वांसमक्ष आपल्या दोन हातांमध्ये हरिजनांचे हात धरून मंदिरात जाऊन देवदर्शन देण्याचा शुभारंभ केला.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील केपे महालात केपे आणि कुडचडे तसेच कुडचडे ते सांगे या रस्त्यांच्या मध्ये काकोडा या निसर्गरम्य गावातील एका उंच टेकडीवर श्री मारुतीरायाचा वास असून संपूर्ण काकोडा गावातील ग्रामस्थांबरोबरच पंचक्रोशीतील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संस्थान मारुतीगडावरील श्री हनुमान जयंती व जत्रोत्सवाला सुरुवात होत आहे.

१६४ वर्षांपूर्वी या टेकडीवर घनदाट जंगल होते. त्यामुळे या टेकडीवर कुणी फिरकत नसत. अशा निर्जन स्थळाचा एक दिवस कायापालट व्हायचा होता, तेथे नंदनवन फुलायचे होते, असा जणू विधी संकेतच असावा. काकोडा गावात दैवज्ञ समाजाचे सदाशिव नागवेकर यांचे घराणे होते. त्यामधील कनिष्ठ पुत्र पुरुषोत्तम (घरात त्यांना आदराने बाप्पा म्हणत) यांच्या अंगी भक्तीची जास्त भावना होती.

एक दिवस श्री पुरुषोत्तम बाप्पांना दृष्टांत झाला. या स्फूर्तियुक्त दृष्टांतातूनच आजच्या या श्री संस्थान मारुतीगडाचा जन्म झाला. हा उत्सव साजरा होऊ लागल्यावर लगेच श्रावण महिन्यात २४ तासांचे अखंड भजन सुरू करण्यात आले. हे दोन्ही उत्सव अजूनही सुरू आहेत. सन १९३१ साली बाप्पा आणि त्यांचे मेहुणे अंता व्यंकटेश रायकर यांच्या मदतीने थेट देवळापर्यंत सुरळीतपणे मोटार जाईल, असा रस्ता बांधून दिला.

देवस्थानचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी सन १९३४ साली कमिटी नेमण्यात आली. बाप्पांनी मार्गशीर्ष वद्य दशमीच्या शुभमुहूर्तावर श्रीस्थळ, गोकर्ण येथील विद्वान भट आणून श्रींची शास्त्रोक्तरित्या स्थापना केली व भटाचीही व्यवस्था केली. बाप्पांच्या हस्ते पार पडलेले शेवटचे कार्य म्हणजे हरिजनांचा मंदिर प्रवेश. महात्मा गांधींच्या महानिर्वाणाच्या अकराव्या दिवशी १० फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांनी सर्वांसमक्ष आपल्या दोन हातांमध्ये हरिजनांचे हात धरून मंदिरात जाऊन देवदर्शन देण्याचा शुभारंभ केला.

गोव्यातील देवालयात हरिजनांना प्रवेश देणारे हे दुसरे देवालय त्यावेळी ठरले. आदल्याच दिवशी श्री संस्थान कामाक्षी, शिरोडा हे देवस्थान हरिजनांसाठी खुले झाले होते. श्री मारुतीरायांचे हे जागृत देवस्थान असून अनेकांना त्यांच्या भक्ती आणि श्रद्धेमुळे इच्छित फळे प्राप्त झालेली आहेत. सुरुवातीपासून देवस्थान कार्यात कै. शंभू पुरुषोत्तम नागवेकर, कै. बाबूराव अंता रायकर, कै. कृष्णा पांडुरंग गावकर आणि कै. विश्वनाथ ऊर्फ चंद्रकांत दामोदर वेर्लेकर यांचे योगदान उल्लेखनीय होते.

श्री संस्थान मारुतीगड वार्षिक जत्रोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

- सुभाष अ. लोटलीकर,

माजी अध्यक्ष, श्री संस्थान मारुतीगड, काकोडा-गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT