Sanvsar Padvo Goa Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Gudi Padwa 2025: 'संवसार पाडवो' हिंदू नववर्षाचा मंगलमय प्रारंभ; गोव्यातील गुढी पाडव्याची अनोखी परंपरा

Goa Gudi Padwa: तुम्हाला माहितीये का गोव्यात सुद्धा हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो, पण कसा?

Akshata Chhatre

Gudi Padwa Celebration in Goa: गुढी पाडवा म्हणजे म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसापासून नवीन वर्ष सुरु होतं. असं म्हणतात वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जसं वागतो तेच वर्षभर केलं जातं म्हणून सणाच्या या दिवशी चांगलं वागावं, इतरांशी गोड बोलावं असं म्हणतात. गुढी पाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. वर्षाची पहिली तिथी. इंग्रजी कॅलेंडरमध्ये जशा तारखा असतात त्याचप्रमाणे मराठीमध्ये तिथीची परंपरा आहे. पण तुम्हाला माहितीये का गोव्यात सुद्धा हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो, पण कसा? चला पाहुयात...

कसा असतो गोव्यातील पाडवा?

गोव्यात गुढी पाडव्याला संसार पाडवा असं म्हणतात आणि हिंदू धर्मानुसार साडे तीन शुभ मुहूर्ताप्रमाणे एक असं याला मानलं जातं. या दिवसापासून सूर्य ट्रॉपिकल कँसरच्या जवळ येऊ लागतो आणि दिवस मोठे व्हायला सुरुवात होते. या दिवशी सकाळी लवकर उठून अजूनही स्त्रिया अंगण झाडून-पासून स्वच्छ करतात.

काही ठिकाणी आजही शेणाच्या जमिनी पाहायला मिळतात जिथे शेण सारवून रांगोळी काढली जाते. बाकी ठिकाणांप्रमाणेच गोव्यात देखील गुढी उभारण्याची परंपरा आहे. या गुढीला रेशमी वस्त्र चढवली जातात, फुलं आणि कडुलिंबाची माळ सोबत जोडली जाते आणि यासोबत असतो तो म्हणजे आंब्याचा टाळा. कोंकणी भाषेत याला घुडी उबारप असं म्हणतात, या गुढीवर तांब्या लावून नवीन वर्षाची सुरूवात केली जाते.

कडुलिंबाचे महत्व काय?

तुम्ही अनेक ठिकाणी कडुलिंबाच्या या दिवशी विशेष महत्व असल्याचं पाहिलं असेल. कडुलिंबाचा आयुर्वेदात औषधी उपाय देखील सांगितलं गेलाय. या काळात आजूबाजूला उष्णता वाढलेली असते आणि अशात स्थितीत कडुलिंब महत्वाचा ठरतो. कडुलिंबाच्या रक्त्त शुद्धीचे गुण आहेत आणि म्हणूनच या काळात कडुलिंबाची पानं घालून पाणी ग्राम करत अंघोळ केली जाते, जेवणाच्या ताटात गोड, आंबट, तिखट आणि कडू असे सर्व पदार्थ असावे म्हणून कडुलिंबाला या सणाच्या दिवशी महत्वाचं स्थान आहे. वर्षभर जिभेचे लाड न करता आपल्या शरीराला काय गुणकारी ते सेवन करावं असा त्याचा उद्देश असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT