Diwali 2024 Faral  Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Diwali 2024: दिवाळीची रंगत चवदार, चविष्ट पदार्थांनी; 'या' स्वादिष्ट रेसिपी बनवा घरच्या घरी

Diwali Faral Marathi: दिवाळी म्हटलं की फराळाशिवाय हा सण पूर्ण होत नाही, चला तर मग दिवाळीचा फराळ स्वादिष्ट आणि रुचकर बनवूया.

गोमन्तक डिजिटल टीम

Diwali Faral 2024

सध्या दिवाळीची लगबग सुरु झाली आहे आणि दिवाळी म्हटलं की फराळाशिवाय हा सण पूर्ण होत नाही. असं म्हणतात मनाचा मार्ग पोटातून सुरु होतो, ज्याचं पोट भरलेलं असतं त्याचं मन देखील प्रसन्न राहतं.

आज आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ बनवण्यात मदत करणार आहोत, कशी? थोडीशी सोपी रेसेपी सांगून.. चला तर मग दिवाळीचा फराळ स्वादिष्ट आणि रुचकर बनवूया.

१) चकल्या:

साहित्य: चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या चण्याची डाळ, एक वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी धने, पाव वाटी जिरे, पाव वाटी तीळ, एक चमचा ओवा, तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल.

कृती: तिन्ही प्रकारच्या डाळी भाजून त्यात धने व जिरे टाकून हे मिश्रण दळून घ्यावे. त्यांनतर दळलेल्या मिश्रणात एक वाटी तेल घालावे. यानंतर तीळ, ओवा, चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि हळद घालावी. पुढे उकळत्या पाणयासह हे मिश्रण एकजीव करावं. पीठ चांगलं मळून झाल्यानांतर चकली पात्रातून चकल्या तयार कराव्यात आणि तेलात तळून घ्याव्यात.

२) शंकरपाळी: (Marathi Faral Recipe)

साहित्य: एक वाटी दूध, एक वाटी साखर, एक वाटी तूप किंवा तेल, मीठ, कणिक किंवा मैदा.

कृती: एक वाटी दूध अगर पाणी घ्यावे आणि त्यात साखर, तूप किंवा तेल घालावे. यात चवीपुरतं मीठ टाकून उकळी काढावी आणि त्यानंतर मावेल एवढा मैदा आगर कणिक घालून त्याचा सैलसर गोळा तयार करावा. हा गोळा थंड झाल्यानंतर तो मळून घेऊन लाटावा. लाटून झाल्यानंतर शंकरपाळीचे आकार पाडावेत.

३) शेव:

साहित्य: चार वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ, अर्धा चमचा पापडखाराची पूड, अर्धा चमचा बेकिंग पावडर, हिंग ओवा, तेल, मीठ.

कृती: पापडखार, ओवा, हिंग आणि मीठ हे जिन्नस एकत्र वाटावेत. यात पाणी घालून मिश्रण एकजीव करावे आणि त्यानंतर पाणी गाळावे. गाळलेले पाणी आणि पाव वाटी तापलेले तेल पिठात घालून पीठ मळून घ्यावे आणि हा पिठाचा गोळा शेवपात्रात घालून तापलेल्या तेलात शेव गाळून घ्यावी. हवा असल्यास यात तुम्ही केशरी रंग घालू शकता ज्यामुळे शेव चांगली दिसते.

४) रव्याचे लाडू:

साहित्य: चार वाट्या रवा, साडेतीन वाट्या साखर, एक नारळ, दीड वाटी तूप, दहा वेलदोडे, दहा ग्राम बेदाणा, पाच-सहा बदाम.

कृती: नारळ खोवून घ्यावा. वेलदोडयाची पूड आणि बदाम एकत्र करावेत. रवा तुपात तांबूस होईपर्यंत भाजावा, रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये खोबरं भाजून घ्यावं. दुसऱ्या भांड्यात साखरेत दीड वाटी पाणी घालून पाक तयार करावा, पुढे यात वेलची पूड, बदामाचे काप, बेदाणा आणि रवा घालून मिश्रण ढवळून घ्यावे. अर्ध्या-पाऊण तासांत हे मिश्रण ढवळून घ्यावे आणि दोन-तीन तासानंतर लाडू वळून घ्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रशिया - युक्रेन युद्ध आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मोठा धोका; जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचे गोव्यात वक्तव्य

Manohar International Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा कॉल आल्याने खळबळ!

Goa Crime: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाला अटक; फोंड्यातील घटना

Goa Live Updates: भूतानी प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा!

गोव्यातील युवकांना दर्जेदार रोजगार न मिळणे हा तर टिकटिकणारा 'टाइमबॉम्ब'!

SCROLL FOR NEXT