Goa Ganeshotsav Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Ganesh Chaturthi 2025: 'बाप्पा'ची मूर्ती कशी असावी? विधींमागचे शास्त्र काय? जाणून घ्या श्री गणेश पूजनाचे महत्व..

Ganesh Chaturthi Pooja: सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो.

Sameer Panditrao

गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेश चतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे.

श्री गणेश चतुर्थीला तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयीचे शास्त्र आणि कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व या लेखात समजून घेऊया.

कुटुंबात गणेश मूर्ती कोणी बसवावी?

श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पूजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पूजावी. ज्या कुटुंबात एकच गणपती बसवण्याची दृढ परंपरा आहे, त्या कुटुंबात देवाविषयी अधिक भाव आहे, त्याच्याच घरी गणपती बसवावा.

नवीन मूर्तीचे प्रयोजन

पूजेत गणपती असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणावी. श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.

श्री गणेश चतुर्थीला पूजावयाची मूर्ती कशी असावी ?

चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी तसेच पर्यावरणाला घातक आहे. मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी. मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. परंपरा किंवा आवड यांप्रमाणे गणेशमूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्रसंमत गणेशमूर्ती पुजावी.

शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी

भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपती करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धिविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपती ठेवून त्याचा उत्सव करू लागला. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपती पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेश विसर्जन करावे.

मध्यपूजाविधी : गणपती घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरत्या आणि मंत्रपुष्प म्हणावे. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रतिदिन करावयाची पंचोपचार पूजा करावी.

उत्तरपूजा : गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी - १. आचमन, २. संकल्प, ३. चंदनार्पण, ४. अक्षतार्पण, ५. पुष्पार्पण, ६. हरिद्रा (हळद)-कुंकूमार्पण, ७. दूर्वार्पण, ८. धूप-दीप दर्शन आणि ९. नैवेद्य. यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्यात आणि मूर्ती उजव्या हाताने हालवावी.

विसर्जन : उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

Sourav Ganguly Head Coach: 'दादा' इन अ न्यू रोल! सौरव गांगुली बनला मुख्य प्रशिक्षक, 'या' संघाची जबाबदारी स्वीकारली

मातीची मूर्ती बनवा, 200 रुपये मिळवा! गोवा सरकारची अनोखी योजना; वाचा माहिती

Viral Video: प्रकृतीचा क्रूर खेळ! सीगल पक्ष्यानं गिळला जिवंत ससा, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Live News: मोठ्या संख्येने रहिवाशांनी "म्हजे घर" उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले

SCROLL FOR NEXT