Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू! पण गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि प्रतिष्ठापनेची वेळ काय?

Ganesh Chaturthi Shubh Muhurat: जगभरातील गणेश भक्तांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात आवडता आणि महत्त्वाचा सण आहे.
ganesh chaturthi puja vidhi
ganesh chaturthi puja vidhiDainik Gomantak
Published on
Updated on

सारांश

  • गणेश चतुर्थी यावर्षी २७ ऑगस्ट २०२५ रोजी असून हा उत्सव १० ते ११ दिवस साजरा होणार आहे.

  • ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होईल.

  • गणपती प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ असा आहे.

Ganesh Chaturthi 2025 date and time: जगभरातील गणेश भक्तांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात आवडता आणि महत्त्वाचा सण आहे. विशेषतः गोवा आणि महाराष्ट्रातील माणूस या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. आता अवघ्या काही दिवसांवर हा सण येऊन ठेपला असल्यामुळे गावी जाण्यासाठी अनेकांनी बॅग भरून तयारी सुरू केली असेल. चला तर, या मंगलमयी पर्वाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि त्यामागील कथा जाणून घेऊया.

कधी आहे गणेश चतुर्थी २०२५?

हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या वर्षी बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. हा उत्सव साधारणतः १० ते ११ दिवस चालतो आणि शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांच्या विसर्जनाने याची सांगता होते.

चतुर्थी तिथी प्रारंभ: २६ ऑगस्ट, दुपारी १:५४ वाजता

चतुर्थी तिथी समाप्ती: २७ ऑगस्ट, दुपारी ३:४४ वाजता

णपती प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त: २७ ऑगस्ट, सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ पर्यंत

गणेश चतुर्थीचे महत्त्व आणि परंपरा

गणेश चतुर्थी हा गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धीदाता आणि प्रथम पूज्य म्हणून ओळखले जाते. भक्त गणपतीची पूजा करून त्यांच्याकडून सुख, समृद्धी आणि नवीन कार्यांमध्ये यश मिळावे यासाठी आशीर्वाद घेतात. हा सण केवळ धार्मिकच नाही, तर सामाजिक सलोखा वाढवणाराही आहे, कारण या निमित्ताने कुटुंबे आणि समाज एकत्र येऊन आनंद साजरा करतात.

ganesh chaturthi puja vidhi
Ganesh Festival 2025: मशिदीत दरवर्षी विराजमान होतो 'गणपती बाप्पा', जाणून घ्या 'या' गावची अनोखी परंपरा

गणपतीच्या जन्माची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा माता पार्वतीने स्नान करताना स्वतःच्या संरक्षणासाठी हळद किंवा चंदनाच्या लेपातून एका पुतळ्याची निर्मिती केली आणि त्यात प्राण फुंकले. हाच तो गणपती. पार्वतीने गणपतीला दारात उभे करून कोणालाही आत येऊ न देण्याची आज्ञा दिली. त्याच वेळी भगवान शिवशंकर तिथे आले, पण गणपतीने त्यांना आत जाण्यापासून अडवले.

गणपती कोण आहे हे माहीत नसल्यामुळे शिवशंकरांनी रागाच्या भरात गणपतीचे शीर धडावेगळे केले. हे पाहून पार्वती अत्यंत दुःखी झाल्या. तेव्हा शंकरांनी गणपतीला पुन्हा जिवंत करण्याचे वचन दिले. त्यांनी आपल्या गणांना जो पहिला जीव दिसेल त्याचे शीर घेऊन येण्यास सांगितले. गणांना एक हत्ती दिसला आणि त्यांनी त्याचे शीर आणले. शंकरांनी ते शीर गणपतीच्या धडावर ठेवून त्याला पुन्हा जिवंत केले आणि तेव्हापासून गणेश 'प्रथम पूज्य' झाले.

प्रश्न व उत्तरे (FAQ's)

  1. प्रश्न: हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी कोणत्या महिन्यात येते? (According to the Hindu calendar, in which month does Ganesh Chaturthi fall?)
    उत्तर: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी येते.

  2. प्रश्न: २०२५ मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे? (When is Ganesh Chaturthi in 2025?)
    उत्तर: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी आहे.

  3. प्रश्न: गणेशोत्सव किती दिवस चालतो? (How many days does Ganesh Utsav usually last?)
    उत्तर: हा उत्सव साधारण १० ते ११ दिवस चालतो.

  4. प्रश्न: विसर्जन कधी होईल? (When will the immersion take place?)
    उत्तर: शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल.

  5. प्रश्न: गणपती प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? (What is the auspicious time for Ganpati Sthapana?)
    उत्तर: २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ हा मुहूर्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com