Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव

Goa Diwali Festival Celebration: गोव्यात दिवाळीचा उत्साह 'नरकासुर दहन' आणि स्थानिक परंपरांच्या अनोख्या मिलाफामुळे अधिक खास ठरतो

Akshata Chhatre

Diwali in Goa Narkasur Celebration: संपूर्ण भारतात दिवाळी म्हटलं की प्रामुख्याने प्रभू रामचंद्रांचे अयोध्येत आगमन आणि देवी लक्ष्मीचे पूजन आठवते. मात्र, गोव्यात दिवाळीचा उत्साह 'नरकासुर दहन' आणि स्थानिक परंपरांच्या अनोख्या मिलाफामुळे अधिक खास ठरतो.

गोव्याच्या दिवाळीची वेगळी कथा

गोव्यात दिवाळीचा केंद्रबिंदू हा नरकचतुर्दशी असतो. ही तिथी भगवान श्रीकृष्णाने क्रूर नरकासुराचा पराभव केल्याचा विजयोत्सव म्हणून साजरी केली जाते.

नरकासुर दहन: दिवाळीच्या पहाटे सूर्योदयापूर्वी गावागावांत आणि वाड्यांमध्ये तरुणांनी कागद व वाळलेल्या गवतापासून बनवलेल्या नरकासुराच्या भयंकर प्रतिमा जाळल्या जातात. हे अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. दहनापूर्वी डीजेच्या तालावर आणि गोव्याच्या ट्रान्स संगीतावर मिरवणुका निघतात.

प्रकाश आणि कला: घराघरांमध्ये मातीच्या पणत्या लावल्या जातात आणि लक्ष्मीच्या स्वागतासाठी मुलांनी बनवलेले आकाशदिवे टांगले जातात. घराच्या उंबरठ्यावर देवीला आकर्षित करण्यासाठी मनमोहक रांगोळ्या काढल्या जातात.

'फोव' आणि 'उटणे'

गोव्यातील दिवाळीच्या सकाळी अभ्यंग स्नानाची परंपरा आहे. यासाठी स्त्रिया चंदन, सुगंधी तेल आणि इतर घटकांनी बनवलेले विशेष मिश्रण 'उटणे' तयार करतात. कुटुंबीय अभ्यंग स्नानानंतर कारीट फोडून पुन्हाएकदा नरकासुर स्वरूपाचे मर्दन केले जाते. यानंतर मंडळी नवीन वस्त्रे परिधान करतात आणि श्रीकृष्णाचे पूजन करतात.

गोव्यातील दिवाळी फराळात 'फोव'चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नरकासुराचा वध झाल्यानंतर कृष्णाने फोवचे पदार्थ खाल्ले होते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी किमान पाच प्रकारचे फोवचे पदार्थ बनवले जातात:

  • बटाटा फोव

  • दुधातलें फोव

  • ताक किंवा दही फोव

  • रोसातलें फोव

  • कालयलें फोव

याव्यतिरिक्त, मंगणे, आंबड्याचे सासवा आणि कुरकुरीत चुरमुरे यांसारखे स्थानिक पदार्थ गोव्याच्या दिवाळीला खास चव देतात.

तुळशीच्या लग्नाची धूम

संपूर्ण भारतात तुळशी विवाहानंतर दिवाळीची सांगता होते, पण गोव्यात मात्र इथूनच 'जत्रा' आणि तुळशीच्या लग्न समारंभ हंगामाला सुरुवात होते. या जात्रा शिगमोत्सवापर्यंत सुरू राहतात. त्यामुळे गोव्यात दिवाळी हा केवळ एक दिवसाचा नव्हे, तर अनेक महिने चालणाऱ्या आनंद आणि उत्साहाचा सोहळा ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्समध्ये 'महाबदल'! आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यरसह 9 स्टार खेळाडूंना नारळ

Pimpal Tree: शेकडो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लावलेला, मोंहेजदाडो,- हडप्पा काळापासून सापडणार सर्वात प्राचीन वृक्ष 'पिंपळ'

Love Horoscope: प्रेमात धोका खाल्लेल्यांनी सावध रहा; नवीन नात्यात येण्यापूर्वी 'या' राशींनी ऐकावी मनाची हाक!

Goa Made Liquor Seized: सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूची विक्री; 90 दारूच्या बाटल्या जप्त, दोघे ताब्यात

Ravindra Jadeja Record: रवींद्र जडेजानं रचला इतिहास, 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरला मागे टाकत केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT