Christmas 2024 Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Christmas 2024: 'नाताळ' शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? प्रभू येशूशी त्याचा संबंध काय?

History of Christmas: सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनस याने २२१ एडी मध्ये २५ डिसेंबर रोजी येशूचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला

Akshata Chhatre

When did Christmas celebrations begin?

नाताळचा सण म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो. असं म्हणतात की या दिवशी येशूचा जन्म झाला होता पण हा उत्सव नेमका कधीपासून सुरु झाला? येशूचा जन्म नेमका कधी झाला याची माहिती कधी शोधण्याचा प्रयत्न केला का? नाताळच्या निमित्ताने आज संपूर्ण गोव्यात सणाचं वातावरण पसरलेलं असताना जाणून घेऊया नाताळ सणामागची नेमकी गोष्ट आहे तरी काय..

'दिएस नातालिस' या लॅटिन शब्दावरून नाताळ हा शब्द रूढ झाला. बेथलहम येथे मेरी आणि जोसेफ यांच्या घरी भगवान येशू यांचा जन्म झाला होता. सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनस याने २२१ एडी मध्ये २५ डिसेंबर रोजी येशूचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

तेव्हापासून ते आजपर्यंत आपण ख्रिसमस २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. रोमन लोकांच्या मान्यतेनुसार २५ डिसेंबरला सूर्याचा जन्म होतो, मदर मेरी यांच्या पोटी येशूने देखील याच दिवशी जन्म घेतला होता म्हणून या दिवसाला पवित्र दिवस मानलं जातं, तसंच हा दिवस नाताळ किंवा ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो.

नाताळच्या दिवशी घराबाहेर ख्रिसमस ट्री उभारण्याची परंपरा आहे. या दिवसाचे निमित्त साधून लोकं एकमेकांना गिफ्ट्स देतात, आनंद व्यक्त करतात. लहान मुलांच्या मनात तर ख्रिसमसच्या दिवशी सांता येऊन आपल्याला भेटवस्तू देऊन जाईल याची ओढ लागलेली असते. येशूच्या जन्माच्या वेळी मदर मेरी ही एका गोठ्यात राहायची आणि तिथेच येशूचा जन्म झाला होता. जगाला तारणारा जन्मला आहे ही आनंदवार्ता मेंढपाळांनी सर्वाना दिली होती म्हणून या दिवशी गोठा, मेंढ्या किंवा मेंढपाळांचे देखावे उभारले जातात. चर्चमध्ये धर्मगुरु येशूच्या जन्माची, त्याच्या बलिदानाची गोष्ट ऐकवतात. घरोघरी दिवशी विविध प्रकारचे केक बनतात, एकूणच काय एकमेकांमध्ये आदर आणि प्रेम भावना कायम राहावी तसेच येशूच्या शिकवणीमधून बोध घेऊन जीवन व्यतीत करावं असा या सणामागचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Repair: '15 दिवसांत रस्‍त्‍यावर एकही खड्डा दिसणार नाही', मंत्री कामत यांचे आश्वासन; कंत्राटदारांना निर्देश दिल्याचे स्पष्टीकरण

Goa Politics: खरी कुजबुज; युती कुणाला नको?

Goa Politics: 'त्यांना जर जवळ केले तर लोक काय म्हणतील'? फुटिरांच्या विरोधात LOP आलेमाव यांचा सवाल; इजिदोरच्या फॉरवर्ड प्रवेशावर नाराजी

Bicholim Accident: 3 दुचाकी एकमेकांवर आदळल्या, डिचोली-साखळी रस्त्यावर विचित्र अपघात; एकजण जखमी Video

Goa Politics: काँग्रेसमध्‍ये सामसूम, फॉरवर्ड - आरजी - आपचा प्रचार सुरू; युतीबाबत विरोधकांत अजूनही ‘तू–तू, मै–मै’

SCROLL FOR NEXT