Manish Jadhav
आज जगभरात ख्रिसमस साजरा केला जात आहे. हा सण देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
ख्रिसमसचे आगमन होताच, नवीन वर्षाचे सेलिब्रेशन देखील सुरु होते.
आज (25 डिसेंबऱ) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून एकेकाळी ख्रिसमस साजरा करण्यावर प्रतिबंध होता आणि ते साजरे करणे पाप का मानले जात होते? याबद्दल जाणून घेणार आहोत...
प्युरिस्ट आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चनांचे असे म्हणणे होते की, धार्मिक व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरे करु नयेत. इतकच नाही तर उत्सव साजरा करणे हे पाप आहे असे या लोकांचे मत होते.
1640 च्या सुमारास ब्रिटनमधून आलेल्या आदेशाद्वारे ख्रिसमसवर बंदी घालण्यात आली. त्यावेळी, या बंदीचा परिणाम ब्रिटनच्या वसाहती असणाऱ्या देशांमध्येही दिसून आला होता.
1660 मध्ये ब्रिटनचा राजा झालेल्या चार्ल्सने हटवली. यानंतरही, वसाहती आणि कट्टरवादी ख्रिश्चन संघटनांनी 1870 पर्यंत ख्रिसमसपासून अंतर राखले.
जरी ख्रिसमसचा सण जगभरात 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, परंतु काही देश असे आहेत जिथे 25 डिसेंबरला नाही तर जानेवारी महिन्यात ख्रिसमस साजरा केला जातो.