गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील ख्रिसमस सेलिब्रेशन प्रसिद्ध आहे. इथला ख्रिसमस का खास वाटतो याची कारणे पाहूयात.
गोव्यातील प्रत्येक घरात, चर्च परिसरात ख्रिसमस ट्री असतो जो स्टार आणि गिफ्ट्सनी सजलेला असतो.
गोव्यात ख्रिसमस मासचा उत्साह अवर्णनीय असतो. चर्चमध्ये होणारी प्रार्थना, नटून येणारे लोक वातावरणाला चार चांद लावतात.
गोव्यात घरोघरी बनणारे केक्स, गोड पदार्थ यांनी चांगलाच माहौल जमतो.
गोव्यात ख्रिसमसच्या दिवशी गावांमध्ये 'कॅरोल' गायले जातात. सर्व ग्रामस्थ एकत्र जमून कॅरोल गातात .
गोव्यातील ख्रिसमस सजावट अद्भुत असते. स्टार्स, लाइट्सच्या मदतीने सगळीकडे नयनरम्य डेकोरेशन्स केलेले असतात.
गोव्यातील ख्रिसमसचा अनुभव इथल्या वातावरणामुळे आहे, कल्चरमुळे आहे हे विसरता कामा नये.