Christmas in Goa: "समेस्त गोयेंकरांवर येशुची कृपा राहो!!" मुख्यमंत्र्यांची प्रार्थना; गोव्यात नाताळचा उत्साह, घरोघरी आनंदाचे वातावरण

Christmas Celebrations in Goa: ख्रिसमसच्या निमित्ताने रात्रीपासूनच गोव्यात येशूच्या प्रार्थना आणि स्तुतीपर कॅरोल गायले जात आहेत
Christmas Celebrations in Goa: ख्रिसमसच्या निमित्ताने रात्रीपासूनच गोव्यात येशूच्या प्रार्थना आणि स्तुतीपर कॅरोल गायले जात आहेत
Christmas in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Christmas in Goa 2024

पणजी: येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो, या निमित्ताने केवळ गोव्यातच नाही तर संपूर्ण जगभरात हा सण आनंदाने साजरा होतो. ख्रिसमस या सणानिमित्त गोव्यातील घरं, चर्चेस आणि रस्ते वेगवेगळ्या लाईट्समध्ये रंगून गेले आहेत. रात्रीपासूनच भाविक गोव्यात येशूच्या जन्मासाठी दाखल व्हायला सुरुवात झाली होती.

ख्रिसमसच्या निमित्ताने काल रात्रीपासूनच गोव्यात येशूच्या प्रार्थना आणि स्तुतीपर कॅरोल गायले जात आहेत. प्रत्येक ख्रिश्चन घराबाहेर येशूच्या जन्माची हुबेहूब प्रतिकृती दाखवणारे देखावे सजवण्यात आलेत.

Christmas Celebrations in Goa: ख्रिसमसच्या निमित्ताने रात्रीपासूनच गोव्यात येशूच्या प्रार्थना आणि स्तुतीपर कॅरोल गायले जात आहेत
Goa Christmas 2024: गोव्यात नाताळची उमेद; जिंगलबेल्ससाठी मार्केटमध्ये ग्राहकांची तुडुंब गर्दी

यामध्ये एक छोटासा गोठा आणि त्यामध्ये नवजात येशू, मदार मॅरी यांच्या छोट्या-मोठ्या मुर्त्या पाहायला मिळतायत. ख्रिमास म्हटलं की हा सण नक्कीच ख्रिसमस ट्री शिवाय अपूर्ण असतो त्यामुळे गोव्यातील अनेक घराच्या बाहेर आजपासून पुढील काही दिवसांपर्यंत सजलेली ख्रिसमस ट्री पाहायला मिळेल.

गोव्यातील ख्रिश्चन समुदाय तसेच आलेल्या पर्यटकांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात. ख्रिसमस हा केवळ एक सण नाही नवीन वर्षाची सुरुवात आहे. नवीन वर्षात येणाऱ्या नवख्या आव्हानांसाठी आपण एकार्थी तयार होत असतो, नवीन वर्षांची सुरुवात आनंदाने केल्यास संपूर्ण वर्ष सुखी जातं असं म्हणतात आणि म्हणूनच गोव्याच्या विविध भागांमध्ये आजपासून थेट १ जानेवारी पर्यंत उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल.

मुख्यामंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोवेकरांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री म्हणाले की अशा सणांमधून परस्परांसोबाबत असलेले संबंध आणखीन दृढ होतात आणि येशू ख्रिस्त देखील शांतता आणि सामंजस्याचं उदाहरण आहे. आजच्या दिवशी सगळी दुःख बाजूला सारून आपण एकत्र आलं पाहिजे, येशूच्या शिकवणीमधून सतत इतरांची मदत करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com